शेतकºयांच्या नावावर कर्जाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 10:03 PM2017-09-23T22:03:22+5:302017-09-23T22:03:37+5:30

बिरसी (कामठा) येथील ११३ शेतकºयांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर तब्बल ५३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Loan loan in the name of farmers | शेतकºयांच्या नावावर कर्जाची उचल

शेतकºयांच्या नावावर कर्जाची उचल

Next
ठळक मुद्दे५३ लाखांची उचल : ११३ शेतकºयांची फसवणूक, कर्जमाफीदरम्यान उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बिरसी (कामठा) येथील ११३ शेतकºयांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर तब्बल ५३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडे त्यांच्याकडे असलेल्या कर्जाच्या चौकशीसाठी धाव घेत आहे. दरम्यान बिरसी (कामठा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून ११३ शेतकºयांच्या नावावर ५३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल करण्यात आली. मात्र आम्ही कर्जाची उचल केली नसल्याचा दावा या शेतकºयांनी शनिवारी (दि.२३) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तर काही शेतकºयांनी जेवढ्या कर्जाची उचल केली त्यापेक्षा अधिकचे कर्ज उचल केल्याची नोंद रेकार्डवर असल्याचा आरोप केला.
बिरसीचे सरपंच रवींद्र तावाडे, रंजीतसिंह पंदेले, भैयासिंग कोहरे, निरंजनाबाई नैकाने, रुक्मिणी पंडले, रामप्रसाद रंजीतसिंह मंडेले, रामजी भेंडारकर, शिरजोरसिंह पंडेले, ज्ञानीराम शिंदे, रतनसिंह मंडेले, सत्यभामा वंजारी, जयसिंह पंडेले, ज्ञानीराम शिंदे, रतनसिंह मंडेले, सत्यभामा वंजारी,जयसिंह बनाफर यांच्यासह २० ते २५ शेतकºयांनी पत्रकार परिषद घेवून हा प्रकार उघडकीस आणला. यापैकी काही शेतकºयांनी कर्जाची उचल केली नाही.
यानंतरही त्यांच्या नावावर ५३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केल्याचे दाखविले आहे. जेव्हा हे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी गेले. तेव्हा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांच्यापैकी काही शेतकरी कर्जदार आहेत. मात्र जेवढ्या कर्जाची त्यांनी उचल केली त्यापेक्षा अधिक कर्जाची उचल केल्याचे दाखविण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी पत्र परिषदेत केला. एकूण कर्जाची उचल केलेली रक्कम २५ लाख ४१५ रुपयांचे व्याज लावले असल्याचे दाखविण्यात आले आहे. २८ लाख ७६ हजार १२ रुपयांच्या कर्जावर २५ लाख रुपयांचे व्याज आकारण्यात आले आहे. याचाच अर्थ एकाच शेतकºयाने मोठ्या रकमेचे कर्ज उचलले नाही हे स्पष्ट होते.
त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकºयांनी केली. या संस्थेची आमसभा २५ सप्टेबर रोजी होणार आहे. त्यात यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.
गुजरात येथे राहणाºया व्यक्तीवर कर्ज
ज्या शेतकºयांच्या नावावर कर्जाची उचल केल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यातील रंजीतसिंह पंडेले यांनी २००८ मध्ये २० हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली होती. त्यानंतर ते त्याचवर्षी परिवारासह गुजरात येथे राहण्यासाठी गेले. मात्र त्यांच्यावर नावावर २००९ मध्ये १२ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केल्याची नोंद संस्थेच्या रेकॉर्डवर आहे. त्यांचा परिवार येथे नव्हताच तर त्यांच्या नावावर कर्जाची उचल कोणी केली असा सवाल रुक्मिनी पंडेले यांनी केला.
थकबाकीदारांच्या यादीत नाव
जयसिंह बनाफर यांनी या संस्थेतून कर्जाची उचल करुन त्याची परतफेड केली. त्यानंतरही त्यांचे नाव कर्जदार शेतकºयांच्या यादीत दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांना याच संस्थेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर कुठलेही कर्ज नसल्याचे पत्र दिले आहे. मग त्यांचे नाव थकीत कर्जदारांच्या यादीत कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे. बनाफर यांनी २००९ मध्ये २६ हजार ८०० रुपयांच्या कर्जाची उचल केली. या कर्जाची त्यांनी २६ सप्टेंबर २०१३ मध्ये परतफेड केली.
मोठे प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता
बिरसी (कामठा) येथील शेतकºयांच्या नावावर कर्जाची उचल केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यास जिल्ह्यातील इतर ठिकाणची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Loan loan in the name of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.