लोकल रुळावर येईना, प्रवाशांचा भुर्दंड कमी होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:33 AM2021-08-20T04:33:32+5:302021-08-20T04:33:32+5:30
राजेश मुनिश्वर सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड रेल्वे मार्गावरून गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्ग असून, सौंदडवरून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ...
राजेश मुनिश्वर
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड रेल्वे मार्गावरून गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्ग असून, सौंदडवरून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ मुंबई-कलकत्ताकडे जातो. मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात रेल्वेगाड्या बंद आहेत. अजूनही या रेल्वेमार्गावरील लोकल रेल्वे गाड्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे याचा प्रवाशांना फटका बसत आहे.
गोंदियावरून चांदाफोर्ट बल्लारशा हे ३०० किमी. अंतर असून, या रेल्वेमार्गावर गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर, गोंदिया-बल्लारशा डेमो, कंटगी-चांदाफोर्ट डेमो, गोंदिया-वडसा डेमो या पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. बिलासपूर-चेन्नई सुपरफास्ट, कोरबा-यशवंतपूर सुपरस्फाट, दरभंगा-चेन्नई, जबलपूर-चांदाफोर्ट या रेल्वेगाड्यासुद्धा या मार्गावर सुरू होत्या. पण सौंदड येथे बल्लारशा-चेन्नई, कोरबा-यशवंतपूर या दोन गाड्यांचा थांबा असल्याने लांब जाणारे प्रवासी प्रवास करीत होते. गोंदिया-बल्लारशा या ३०० किमी. रेल्वेमार्गावर वडसा, नागभीड जंक्शन असूनसुद्धा सुपरफास्ट चालणाऱ्या गाड्यांचा थांबा कोरोना महामारीचे कारण पुढे करीत सौंदड, वडसा, नागभीड येथील थांबा बंद केला. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियाच्या टोकावर असलेल्या प्रवाशांना पुणे, नागपूर, मुंबई, जबलपूर जाण्यासाठी २०० ते २५० किमी चंद्रपूर किंवा गोंदियाला जाण्यासाठी गरीब व मध्यमवर्गीय लोकांना प्रवास करण्यासाठी खासगी वाहनाने जावे लागते. मात्र याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.
......
गाड्यांना थांबे देण्यात दुजाभाव
गोंदिया-जबलपूर या ३०० किमी. अंतरावर दोन जंक्शन येत असून, गोंदियावरून बालाघाट ४५ किमी., बालाघाटवरून नैनपूर ७० किमी अंतर आहे. या दोन्ही जंक्शनमध्ये जबलपूर-चांदाफोर्ट गाडीचा थांबा दिला आहे. जबलपूर-गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेगाडी या ३०० किमीवर ९० किमी वडसा जंक्शन ४० किमी, नागभीड जंक्शन असून, इथे थांबा असूनसुद्धा थांबा दिला नाही. यावरून केंद्र शासन दुजाभाव करीत असल्याचे दिसून येते.