आश्वासनानंतर उघडले शाळेचे कुलूप

By admin | Published: July 4, 2015 02:12 AM2015-07-04T02:12:28+5:302015-07-04T02:12:28+5:30

अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर माहुरकुडा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला लावण्यात आलेले कुलूप

The lock of the school opened after the assurance | आश्वासनानंतर उघडले शाळेचे कुलूप

आश्वासनानंतर उघडले शाळेचे कुलूप

Next

अर्जुनी मोरगाव : अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर माहुरकुडा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला लावण्यात आलेले कुलूप शुक्रवारी (दि.३) उघडण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ही शाळा बंद आहे.
प्राप्त माहितीनुसार ३० जून रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पार पडली. १ जुलै रोजी मुख्याध्यापक बी.एन. मेश्राम हे सकाळी ७.३० वाजता शाळेत हजर झाले. त्यांनी फाटक व कार्यालयाचे दार उघडले.
शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांना आज सकाळची शाळा आहे काय? इतर शिक्षक कां आले नाही त्यांची गैरहजेरी लावा असे वक्तव्य केले. त्याचवेळी मुख्याध्यापक आपल्या दुचाकीने निघून गेले. मुख्याध्यापक ऐकत नाही. वारंवार शाळेत अशीच प्रकरणे घडत आहेत म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने १ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकले होते. तेव्हापासून शाळा बंदच होती.
शाळा बंद पाडल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात केली होती. गुरुवारला सायंकाळी शाळा व्यवस्थापन समिती सोबत चर्चा झाल्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला.
एक महिन्याचे आत मुख्याध्यापकांची बदली करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. यानंतर शाळेत शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांकडे चाब्या सुपूर्द करण्यात आल्या. आजपासून (दि.३) शाळा पूर्ववत सुरू झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The lock of the school opened after the assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.