लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 05:00 AM2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:22+5:30

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व उद्योग आणि व्यवसायांना बंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही व्यवसाय आणि उद्योगांमध्ये शिथिलता देण्यात आली. यामुळे बांधकाम व्यवसायाचा देखील समावेश आहे. त्यानुसार लॉकडाउनमुळे बंद पडलेले बांधकाम जोमाने सुरु झालेले आहे.

Lockdown made the common man's dream of a home expensive | लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न महागले

लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न महागले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. या दरम्यान सर्वच व्यवसाय बंद होते. त्यामध्ये बांधकाम व्यवसाय सुद्धा अडचणीत आला होता. मात्र मध्यंतरी या व्यवसायास शिथिलता दिल्याने सद्यस्थितीत बांधकाम व्यवसाय पुन्हा सुरु झाले आहे. सध्या सुरु असलेली कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी होणे गरजेचे होते. तरीही सिमेंट, लोखंड, वीट, रेती या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दर कमालीचे वधारले आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व उद्योग आणि व्यवसायांना बंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही व्यवसाय आणि उद्योगांमध्ये शिथिलता देण्यात आली. यामुळे बांधकाम व्यवसायाचा देखील समावेश आहे. त्यानुसार लॉकडाउनमुळे बंद पडलेले बांधकाम जोमाने सुरु झालेले आहे. मात्र बांधकाम व्यवसाय सुरु असला तरी त्यासाठी लागणारे साहित्य आता सुमारे ३० टक्क्याने महागले आहे. सीमेंटच्या प्रती पोत्यामागे ८० रुपये वाढ झाली आहे.
लॉकडाऊनपूर्वी सीमेंट बॅगचा दर २७० ते ३०० रुपये होता. आता हा दर ३६० ते ४०० रुपये झाला आहे. तथापि भाव वधारले असताना देखील विशेषत: सीमेंटचा तुटवडा भासत असल्याने निर्धारित किमतीपेक्षाही चढ्या दराने सीमेंटची विक्री सध्या होत आहे. यासोबतच लोखंड (सळाख)च्या भावातही कमालीची वाढ झालेली आहे. लॉकडाऊनपूर्वी सहा एमएम वगळता इतर मापाच्या लोखंडी गजाचे भाव कमी अधिक प्रमाणात ३६०० रुपये क्विंटल होता. तो आता तब्बल हजार रुपयांनी वाढला असून त्याचे दर ४ हजार ८०० पेक्षा अधिक क्विंटलने विक्रीला जात आहे. पावसाळा लागण्यापूर्वी बांधकाम पूर्णत्वास जाणे गरजेचे असल्याने अनेकांना नाईलाजाने भडकलेल्या दरात तर कधी बांधकाम साहित्य विक्रेत्यांच्या मनमानीप्रमाणे चढ्या दरात साहित्य खरेदी करावेच लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे.

Web Title: Lockdown made the common man's dream of a home expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.