शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:47 PM2019-02-26T21:47:23+5:302019-02-26T21:47:40+5:30
तालुक्यातील बबई केंद्रातंर्गत येणाऱ्या कवडीटोला येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद बऱ्याच महिन्यापासून रिक्त आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते होते. शिक्षकाचे पद भरण्याची मागणी वांरवार करुन सुध्दा पद भरण्यात न आल्याने संतप्त पालक व शालेय व्यवस्थापन समितीने मंगळवारी (दि.२६) शाळेला कुलूप ठोकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील बबई केंद्रातंर्गत येणाऱ्या कवडीटोला येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद बऱ्याच महिन्यापासून रिक्त आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते होते. शिक्षकाचे पद भरण्याची मागणी वांरवार करुन सुध्दा पद भरण्यात न आल्याने संतप्त पालक व शालेय व्यवस्थापन समितीने मंगळवारी (दि.२६) शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी गोरेगाव पंचायत समिती गाठून तिथे शिक्षकाच्या मागणीसाठी ठाण मांडले होते. अखेर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर कवडीेटोला शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार कवडीटोला जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून एकूण ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.एकाच शिक्षिकेच्या भरोश्यावर शाळा सुरू आहे. त्यामुळे या शाळेला दोन शिक्षक देण्याची मागणी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती, पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना केली होती. पण शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पालक व शालेय व्यवस्थापन समितीने मंगळवारी (दि.२६) शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट पंचायत समितीचे कार्यालय गाठून त्या ठिकाणी ठाण मांडले. शिक्षकाची नियुक्ती केल्याशिवाय या ठिकाणाहून हटणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान माजी सभापती दिलीप चौधरी यांनी मध्यस्थी करुन शिक्षण विस्तार अधिकारी भेंडारकर यांनी सहायक शिक्षक पी.टी.परशुरामकर यांना कवडीटोला शाळेत रु जू होण्याचे आदेश दिले. परशुरामकर यांनी होकार देताच या चिमुकल्यांची मागणी पूर्ण झाली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले व शाळा पूर्ववत सुरू झाली.