बकी शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:48 AM2017-08-12T01:48:17+5:302017-08-12T01:48:41+5:30

पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाºया वरिष्ठ प्राथमिक शाळा बकी (मेंडकी) येथे शिक्षकांची पदे रिक्त आहे.

Locked by villagers | बकी शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप

बकी शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप

Next
ठळक मुद्देशिक्षकाचे पद भरण्याची मागणी : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाºया वरिष्ठ प्राथमिक शाळा बकी (मेंडकी) येथे शिक्षकांची पदे रिक्त आहे. शाळेला अजून दोन शिक्षक देण्यात यावे, या मागणीसाठी गावकºयांनी एकत्र येत शाळेला गुरूवारी (दि.१०) रोजी कुलूप ठोकले.
बकी (मेंडकी) येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. सध्यास्थितीत १५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या ठिकाणी ५ शिक्षक कार्यरत असून अजून दोन शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी पालकांची आहे. यासाठी त्यांनी शिक्षण विभाग आणि पंचायत समितीच्या अधिकाºयांना वांरवार निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संप्तत झालेल्या पालक आणि गावकºयांनी इयत्ता सहावी ते आठवी करिता दोन शिक्षक देण्यात यावे, या मागणीला घेऊन शाळेला कुलूप ठोकले. सहावी ते आठवीसाठी केवळ एकच शिक्षक असल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावकरी आणि शाळा समितींनी शिक्षक देण्याची मागणी केली. परंतु ती मागणी शिक्षण विभागाने पूर्ण केली नाही. शाळा समिती आणि गावकºयांनी १० आॅगस्ट रोजी जि.प. शाळेला कुलूप ठोकले. गटशिक्षणाधिकारी मांढरे यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. शिक्षण विस्तार अधिकारी कोवे यांनी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले. मात्र गावकरी आपल्या मागणीवर ठाम असून ११ आॅगस्ट रोजीही शाळेला कुलूप लागले होते. विद्यार्थी बाहेर बसले होते. दरम्यान शिक्षण विभाग व या परिसरातील लोकप्रतिनिधीनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी याकडे लक्ष द्यावे.

Web Title: Locked by villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.