लोहिया शिक्षण संस्था, सौंदड (पुरवणी मजकूर)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:29 AM2021-05-10T04:29:11+5:302021-05-10T04:29:11+5:30
संस्थेच्यावतीने गावातील लोकांची उन्नती साधल्या जावी, शैक्षणिक दर्जा उंचावणे व सर्वांगीण विकास करणे हे ध्येय आमच्या विद्यालयाचे आहे. संस्थापक-संस्थाध्यक्ष ...
संस्थेच्यावतीने गावातील लोकांची उन्नती साधल्या जावी, शैक्षणिक दर्जा उंचावणे व सर्वांगीण विकास करणे हे ध्येय आमच्या विद्यालयाचे आहे. संस्थापक-संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांचे खंबीर नेतृत्व, योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची तळमळ, जिज्ञासा, चिकाटी व कार्य पार पाडण्याचे कौशल्यामुळे तसेच मधुसूदन अग्रवाल-प्राचार्य, रामेश्वरदास जमनादास लोहिया विद्यालय, गुलाबचंद चिखलोंढे-प्राचार्य, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, मनोज शिंदे-मुख्याध्यापक, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच श्रीमत संयुक्ता जोशी, लोहिया कॉन्व्हेंट अॅन्ड प्रायमरी स्कूल सौंदड यांच्या कार्यक्षम प्रशासनामुळे संस्थेअंतर्गत विद्यालयांच्या सर्व घटकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे विद्यालयातील सर्व घटक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात.
संस्थेद्वारा वेळोवेळी समाजपयोगी कार्य करून समाजसेवेचा घेतलेला वसा सार्थ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत त्सुनामी संकटकाळात मदतीसाठी ५ जानेवारी २००५ ला गावात रॅली काढून त्यात जमा झालेला २१०००/- रुपयांचा निधीचा धनादेश खा. प्रफुल्ल यांच्या स्वाधीन करण्यात आला होता.
तसेच १ जुलै २०१६ ला रेल्वे स्टेशन, सौंदड परिसरात झाडे लावून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी सावलीची सोय व त्या झाडांची २ वर्षांपर्यंत देखरेख. याप्रमाणेच संत जगनाडे महाराज परिसरातदेखील वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच ५ डिसेंबर २०१६ ला चुलबंद नदीवर सरपंच श्रीमती बडोले, ग्रा.पं. सौंदड तसेच श्रीमती गायत्री इरले सौंदड यांच्या नेतृत्वात व लोहिया शिक्षण संस्था सौंदड यांच्या माध्यमातून आर.जे. लोहिया विद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मोठा वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे पाण्याची पातळी वाढविण्यास मदत झाली.
जगदीश लोहिया-माजी सरपंच सौंदड यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची अनेक वर्षांपूर्वीची मागणी वेस्टवेअरची उंची वाढवून पूर्ण केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय वाढ घडवून आणली व पाण्याच्या वितरणासंबंधी दीर्घकालीन व्यवस्था केली ती आजतागायत सुरू असून परिसरातील अनेक गावांनी या व्यवस्थेचे अनुकरण केले आहे. त्यांच्या दूरदृष्टी, द्रष्टेपणा व सर्वसामान्यांविषयी असलेल्या कळवळ्याची साक्ष देते.
ज्या संतांनी आणि सन्माननीय लोकांनी या विद्यालयाला भेट देऊन विद्यालयाच्या संख्यात्मक तसेच गुणात्मक उत्तरोत्तर प्रगतीवर आनंद व्यक्त करून प्रशंसा केली आहे, त्यामध्ये क्रांतिकारी संत मुनिश्री तरुणसागरजी महाराज यांचे विद्यालयात दि. ०९ व १० नोव्हेंबर २००९ ला आगमन, दर्शन व प्रवचन झाले. ‘एक विद्यालय खोलना सौ जेलों को बंद करने जैसा है’ या म्हणीला सार्थ करण्याचे काम लोहिया परिवार करीत असल्याचे सांगत त्यांचा गौरव केला होता. ‘लोहिया विद्यालय के प्रबंधकों/संचालकों को मेरा शुभाशीर्ष’ असा लिखित अभिप्रायस्वरूप आशीर्वाद दिला.
त्याचप्रमाणे पूज्यनीय आचार्य श्री महाश्रमणजी यांचे विद्यालयात दि.१४ व १५ मार्च २०२१ ला आगमन, दर्शन व प्रवचनाचा लाभ मिळाला.
तसेच पूज्यनीय साध्वीजी संवेगानिधी श्रीजी यांच्यासुद्धा आगमन, दर्शन व प्रवचनाचा लाभ परिसरातील सर्वांना मिळाला. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी शिक्षण राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, छेदीलाल गुप्ता, केवलचंदजी जैन, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार विनोद अग्रवाल, शिक्षक आमदार डायगव्हाणे, माजी आमदार सेवक वाघाये, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, माजी आमदार स्वरूपचंद जैन, जयंतराव कटकवार, दयाराम कापगते, हेमकृष्ण कापगते, कैलास नक्षिणे, बापुसाहेब लाखणीकर- संस्थापक, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठवरे, रजनीताई नागपुरे, उषाताई मेंढे, राधेश्याम अग्रवाल, अमेरिका स्थित रहिवासी किसनलाल खंडेलवाल, माजी अध्यक्ष सुभाषचंद्र अग्रवाल तसेच नरेशकुमार माहेश्वरी माजी नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांचे सातत्याने संस्थेला मार्गदर्शन मिळत असल्याने संस्थेची सातत्याने प्रगतीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.
शिक्षण तसेच विविध क्षेत्रांशी संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी या विद्यालयाला भेट देऊन प्रोत्साहन दिले त्यामध्ये श्री. मराठे-शिक्षण संचालक पुणे, मा. भाऊ गावंडे-शिक्षण उपसंचालक, मा. मस्के-शिक्षण उपसंचालक, मा. डॉ. प्रकाश मालगावे-अध्यक्ष राष्ट्रीय मत्स्यजीवी संघ दिल्ली, मा. गुप्ता-प्रभारी जिल्हाधिकारी, मा. सावनकुमार-भा.प्र.से., मंदर वैद्य-उपजिल्हाधिकारी, गोंदिया, मा. उमाकांत देशपांडे-अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर, मा. पांढरीपांडे-अध्यक्ष नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूर, मा.एच.रहमान-संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, मा. ममता झा-शिक्षणाधिकारी, मा.आर.एन. मेश्राम-शिक्षणाधिकारी, मा. शरद खंडागळे-शिक्षणाधिकारी, मा. कंधारकर-शिक्षणाधिकारी, मा. प्रमोद पनके-शिक्षणाधिकारी, मा. गजानन काळे-शिक्षणाधिकारी, मा. खोब्रागडे, मा. अरुण फटे-शिक्षणाधिकारी, मा. राजकुमार हिवारे -शिक्षणाधिकारी मा.मोहबंशी-उपशिक्षणाधिकारी, मा. गौतम-गटशिक्षणाधिकारी, मा. गजानन राजमाने-उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी, मा.राम. जोशी, उपविभागीय अधिकारी, मा. प्रशांत पाटील उपविभागीय अधिकारी, मा.किशोर पर्वते- पोलीस निरीक्षक, मा. विजय पवार-पोलीस निरीक्षक, मा. सचिन वांगडे-पोलीस निरीक्षक, डी.बी. गावडे-मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोदिया, मा. पूजा अग्रवाल, मा. चाफले-डी.वाय.एस.पी., मा. मेश्राम-तहसीलदार, मा. प्रताप वाघमारे-तहसीलदार, मा. हंबरडे-प्राचार्य, शिक्षण प्रशिक्षण संस्था, मा. रुद्रकार-प्राचार्य शिक्षण प्रशिक्षण संस्था, मा. प्राचार्य वाघाये-डी.एड. कॉलेज तुमसर, मा.थोरात-गटशिक्षणाधिकारी, मा. जोहरापुरकर-निरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालय, नागपूर, मा.कुकडे-निरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर, मा.फसाटे-गटशिक्षणाधिकारी, मा.पाटेकर-अधीक्षक, वेतन पथक, मा. चिंतामन थेर-गटशिक्षणाधिकारी, मा.वाघाये सर, मा. अनिल मेश्राम सर, मा.काझी सर यांचे सहकार्य आणि िविद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
त्याचप्रमाणे विद्यालयात ०२ ऑक्टोबर २०१८ ला गांधी जयंतीच्या शुभप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला वृत्तपत्र प्रतिनिधी मा. रमनकुमार मेठी-्रजिल्हा प्रतिनिधी-नवभारत, मा. अंकुश गुंडावार-जिल्हा प्रतिनिधी- लोकमत, मा. संतोष शर्मा-जिल्हा प्रतिनिधी दैनिक भास्कर, मा. हिदायत शेख -जिल्हा प्रतिनिधी देशोन्नती यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
लोहिया संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या विद्यालयांचे व्यवस्थापन करताना संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळ, हितचिंतक व मित्रमंडळी यांना अनेकदा अपमान आणि अपेक्षा वाट्याला आली. चूक नसतानाही डावलले गेले, गुणवत्ता असूनही नाकारले गेले. जेथे मोठ्या अपेक्षेने पाहावे तेथेच नकारघंटा ऐकायला मिळते. कारण संस्थेच्या विरोधी लोकांच्या आहारी गेल्यामुळे संस्थेला अकारण त्रास दिल्या गेला व त्यामुळे संस्थेच्या संचालकाच्या व्यक्तिगत, सामाजिक व राजकीय जीवनावर परिणाम झाला तसेच संस्थेच्या विस्तारालादेखील खीळ बसून अपरिमित हानी झाली. अपमान व डावलल्या जाण्याने मनुष्य आतून दुखावला जातो, अनेकांना नैराश्य येते, आत्मविश्वास कमी होतो, बदला घेण्याची, सुडाची भावना निर्माण होते. तसेच संबंधावर, मन:स्वास्थ्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. परंतु इतके सगळे होऊनही लोहिया संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळींनी हिंसा व बदल्याच्या भावनेच्या आहारी न जाता, सत्य व अहिंसेच्या मार्गाने प्रतिकार केला. त्यामुळे संस्थेेतर्गत विद्यालयावर जेव्हा जेव्हा संकटे आली, त्यावेळी संस्थेच्या सत्यबाजूने अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचे संस्थेला सहकार्य लाभले. अकारण काही लोकांनी वाईट हेतूने संस्थेला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयानेदेखील संस्थेच्या बाजूने निर्णय देऊन संस्थेच्या पवित्र कार्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
ओंकार केशव चोपकर या विद्यार्थ्यांने एस.एस.सी. मार्च-२०१७ परीक्षेत ९८.६० टक्के गुण मिळवून विदर्भातून द्वितीय व विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यावेळी संस्थेने लॅपटॉप देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्रात दि.०७ ऑगस्ट २०२० ला अयोध्या येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर भूमिपूजन शुभप्रसंगी विद्यालयातील एस.एस.सी. मार्च -२०२० परीक्षेत कु. ट्विंकल संजय उके या विद्यार्थिनीने ९८.४० टक्के गुण मिळून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल संस्थेने टॅबलेट देऊन तसेच ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या २३ प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना हातघडी देऊन सत्कार तसेच माविका अंतर्गत प्राप्त ८२ सायकलींचे वितरण मा. मनोहरराव चंद्रिकापुरे आमदार अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र, मा. एन. एम. गावळ नायब तहसीलदार, मा. जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच २९ डिसेंबर २०२० ला भगवान श्रीदत्तजयंती व संस्थेचे आधारस्तंभ स्व. रामेश्वरदासजी लोहिया यांची पुण्यतिथी, ०३ जानेवारी २०२१ ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मा. सचिन वांगडे व मा. जगदीश लोहिया यांच्या प्रमुख आतिथ्याखाली तसेच दि. ३० मार्च २०२१ ला संत तुकाराम बीज कार्यक्रम व विद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. मधुकर झोडे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार संस्थेतर्फे मा. जगदीश लोहिया यांच्या शुभहस्ते भगवान श्री गणेशजीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्र २०१३-१४ मध्ये पायका व्हॉलीबाल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरासाठी लौकिक बाबुराव राऊत वर्ग-१० या विद्यार्थ्यांची निवड झाली होती.
प्रसंगानुसार वेळोवेळी संस्थेद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सौंदड येथील रामदेवबाबा मंदिर मूर्ती स्थापनाप्रसंगी दि.३०/०१/१९९१ ला विद्यालयात विद्यार्थ्यांच्याद्वारे २०००० लोकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच सौंदड येथील रामदेवबाबा मंदिर मूर्ती स्थापना २५ वर्षे पूर्ण झाल्याप्रसंगी २ फेब्रुवारी २०१६ लासुद्धा महाप्रसादाचे वितरण विद्यार्थ्यांच्याद्वारे करण्यात आले. त्याचप्रमाणे ०९/०१/२००० ला गणेशजींच्या महाआरतीने ५००० लोकांच्या उपस्थितीत २० व्या शताब्दीला निरोप व २१ व्या शताब्दीचे स्वागत करण्यात आले.
विद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. मा. जगदीश लोहिया-संस्थापक-संस्थाध्यक्ष यांचे सहकार्य नेहमीच मिळत असते., ३० वर्षांत मा. जगदीश लोहिया यांच्या चिकाटी, कौशल्य, जिज्ञासा, मेहनत व खंबीर नेतृत्वामुळेच विद्यालयास भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी, संस्था व शिक्षण विभागाच्या सहकार्यानेच विद्यालयाचा विकास झपाट्याने होत आहे. यात संस्था, संस्थांतंर्गत सर्व समिती पदाधिकारी व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे.