लोकचळवळीने ११४ गावे प्रगतीच्या वाटेवर

By Admin | Published: December 31, 2015 01:50 AM2015-12-31T01:50:46+5:302015-12-31T01:50:46+5:30

तंटामुक्त मोहीमेला नक्षलवाद्यांनी टार्गेट केले आहे. परंतु नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता गोंदिया जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त अतिसंवेनशिल गावात लोकचळवळ उभी झाली आहे.

Lok Sabha 114 villages in progress | लोकचळवळीने ११४ गावे प्रगतीच्या वाटेवर

लोकचळवळीने ११४ गावे प्रगतीच्या वाटेवर

googlenewsNext

दहशत संपली : तंटामुक्त अध्यक्ष व सदस्यांचा हिरीरीने सहभाग
गोंदिया : तंटामुक्त मोहीमेला नक्षलवाद्यांनी टार्गेट केले आहे. परंतु नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता गोंदिया जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त अतिसंवेनशिल गावात लोकचळवळ उभी झाली आहे.
शासनाने अमंलात आणलेल्या तंटामुक्त मोहिमने आदिवासी जनता व पोलीसांना जोडण्याची कामे केली. ज्या गावात शासनाच्या योजनांना थारा नव्हता त्या गावात तंटामुक्त मोहीमेला हिरहिरीने राबविले. यासाठी नक्षलवाद्यांनी तंटामुक्त गाव मोहीमेविरूध्द एल्गार पुकारून तंटामुक्त मोहीम राबविणाऱ्या गावकऱ्यांना समितीचे अध्यक्षपद व सदस्यता सोडण्याचे फर्मान नक्षलवाद्यांनी सोडले होते.
महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहीमेमुळे गावागावात लोकचळवळ उभी झाली. ही मोहीम सुरू होण्यापुर्वी नक्षलग्रस्त गावात शासकीय योजनांना राबविण्यास नागरिकांमध्ये उदासिनता होती. मात्र तंटामुक्त मोहीमेत लोकसहभाग असल्याने गावातील नागरीक या मोहीमेशी जुळले. या मोहीमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. नक्षलग्रस्त गावात पोलिसांशी बोलण्यास आदिवासी तयार नव्हते. त्या गावात या तंटामुक्त मोहीमेमुळे आदिवासी जनता व पोलीस यांच्यातील दुरावा कमी करून त्यांचे मने जोडली.
नक्षल चळवळीची माहिती पोलिसांना मिळण्यास या मोहीमेची बरीच मदत झाली. आदिवासी जनता व पोलीस या मोहीमेने जवळील आल्याने नक्षलवाद्यांनी या तंटामुक्त मोहीमेला टार्गेट केले. पाच वर्षापुर्वी नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून तंटामुक्त मोहीम बंद करा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, अशी धमकी दिली होती.
त्यामुळे ग्राम पंचायत निवडणुकीनंतर नक्षलवाद्यांनी सरपंच, ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष व सदस्यांनी राजीनामा द्यावा असे फर्मान सोडल्यामुळे गोंदिया, गडचिरोली, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले होते.
सन २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या दबावामुळे ३ एप्रिल २०१२ पासून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कुरखेडा, अहेरी, कोरची अश्या अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील ३३१ लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले होते.
काही दिवस राजीनाम्याचा सूर चालल्यानंतर हा प्रकार थांबला. नक्षलवाद्यांची दहशत आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे आपला जीव धोक्यात टाकून कोणतेही पद नको, अशी भूमिका तंटामुक्त अध्यक्ष व सदस्यांची होती.
परंतु आता ती दहशत राहीली नसून तंटामुक्त मोहीमेच्या रूपाने पुन्हा लोकचळवळ उभी झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lok Sabha 114 villages in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.