Lok Sabha Election 2019; भाजपच्या ‘कथनी आणि करनीत’ फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 09:45 PM2019-04-07T21:45:48+5:302019-04-07T21:52:41+5:30

भाजप सरकाराने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच भाजपला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. तर भाजपच्या कथनी आणि करनीत बराच फरक असून या सरकारला केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देता येते अशी टीका खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली.

Lok Sabha Election 2019; BJP's 'Kathani and Karineat' difference | Lok Sabha Election 2019; भाजपच्या ‘कथनी आणि करनीत’ फरक

Lok Sabha Election 2019; भाजपच्या ‘कथनी आणि करनीत’ फरक

googlenewsNext
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : गोंदिया तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजप सरकाराने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच भाजपला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. तर भाजपच्या कथनी आणि करनीत बराच फरक असून या सरकारला केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देता येते अशी टीका खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली.
राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.७) गोंदिया तालुक्यातील दासगाव, काटी, कामठा, नंगपुरा-मुर्री, भीमनगर, छोटा गोंदिया, मामा चौक, सिंधी कॉलनी येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या एका दिग्गज नेत्याने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आम्ही जनतेला त्यांच्या गरजेनुसार सर्व वचन दिल्याचे म्हटले आहे.
भाजपचे नेता आता स्वयं हे स्वीकारीत असून भाजपच्या कथनी आणि करणीला आता समजण्याची वेळ आली आहे. या मुखाखतीचा पंचनामा करीत पटेल यांनी, भाजपच्या खोट्या आश्वासनांना बळी पडून जनतेने भाजपला सत्ता दिली. मात्र भाजपचे नेते आता कुणी आम्हाला त्या वचनांबद्दल विचारल्यास आम्ही हसून पुढे निघून जातो असे म्हणत आहेत. यामुळे भाजपचे प्रत्येकच वचन खोटे असून चौकीदार सुध्दा या मुद्दांपासून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले.
गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. आ.गोपालदास अग्रवाल म्हणाले, केंद्र व राज्य सरकार केवळ जुमलेबाज असून या सरकारला केवळ खोटी आश्वासने देता असल्याची टीका केली.

Web Title: Lok Sabha Election 2019; BJP's 'Kathani and Karineat' difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.