Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांची सोडून उद्योगपतींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:02 PM2019-04-09T23:02:19+5:302019-04-09T23:03:56+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविले. मात्र आज तेच मोदी पूर्णपणे बदलले असून ‘अच्छे दिन’च्या गोष्टीही ते करीत नाही. मागील वर्षांत वॅटच्या माध्यमातून सरकारला आठ लाख कोटींचा महसूल मिळत होता. आता मात्र यावर्षी जीएसटीमुळे १२ लाख कोटी रूपये सरकारला मिळाले असून ते सर्वसामान्यांच्या खिशातून काढलेले आहेत.

Lok Sabha Election 2019; Businessman's debt waiver from farmers | Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांची सोडून उद्योगपतींची कर्जमाफी

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांची सोडून उद्योगपतींची कर्जमाफी

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : महाआघाडीच्या शहर व ग्रामीण भागातील प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविले. मात्र आज तेच मोदी पूर्णपणे बदलले असून ‘अच्छे दिन’च्या गोष्टीही ते करीत नाही. मागील वर्षांत वॅटच्या माध्यमातून सरकारला आठ लाख कोटींचा महसूल मिळत होता. आता मात्र यावर्षी जीएसटीमुळे १२ लाख कोटी रूपये सरकारला मिळाले असून ते सर्वसामान्यांच्या खिशातून काढलेले आहेत. या रकमेचा लाभ देशातील जनतेला मिळाला नाही. सरकारने या पैशांतून शेतकऱ्यांची नव्हे तर चार उद्योगपतींची चार लाख कोटींची कर्जमाफी केल्याची टीका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.
राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस-आरपिआय, पिरिपा, खोरिपा महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरासह ग्रामीण भागात आयोजित प्रचार सभांना संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, सन २००९ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. मात्र भाजप सरकारची शेतकºयांप्रती कशाप्रकारचीही जबाबदारी व आत्मीयता नाही. यामुळेच आजही शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांच्या चकरा मारत आहेत. प्रत्येकालाच या सरकारने कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रासवून सोडले असल्याचा आरोपही केला.
याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती सीमा मडावी, प्रकाश रहमतकर, रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिल करचाल, निता पटले, विनिता टेंभरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha Election 2019; Businessman's debt waiver from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.