Lok Sabha Election 2019;पावणेसहा लाख मतदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:09 PM2019-04-15T22:09:31+5:302019-04-15T22:10:16+5:30

लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.

Lok Sabha Election 2019; Fifteen lakh voters are recruited | Lok Sabha Election 2019;पावणेसहा लाख मतदारांची पाठ

Lok Sabha Election 2019;पावणेसहा लाख मतदारांची पाठ

Next
ठळक मुद्देशहरी मतदारांत उदासीनता : २,७८,५२३ पुरूष आणि २,९५,३१३ महिला मतदानाला गेल्याच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.
भंडारा-गोंदिया मतदार संघात १८ लाख आठ हजार ७३४ मतदार आहे. मतदान सक्तीचे नसले तरी सर्वांनी मतदान करावे, अशी अपेक्षा आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबविली. परंतु प्रत्यक्षात ६८.२७ टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.
या मतदार संघातील नऊ लाख पाच हजार २७२ पुरूष मतदारांपैकी सहा लाख २६ हजार ७४९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल दोन लाख ७८ हजार ५२३ मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेच नाही तर नऊ लाख तीन हजार ४६० महिला मतदारांपैकी सहा लाख आठ हजार १४७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल दोन लाख ९५ हजार ३१३ महिला मतदार मतदानासाठी आल्याच नाहीत.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान बघितल्यास शहरी मतदारांनीच मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भंडारा शहरातील एक लाख २५ हजार ९१४ आणि गोंदिया शहरातील एक लाख १३ हजार ७५ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.
तुमसर विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ३४, साकोली विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ७०५, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ७२ हजार २६८, तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८३ हजार ८४२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे.
मतदानासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात व्यापक मोहीम राबविली होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. घरपोच व्होटर आयडी स्लीप पोहचविण्यात आली. त्यानंतर अनेकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच नाही. शोसल मिडियावरूनही व्यापक जनजागृतीचा परिणाम दिसला नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला.
मतदान टाळण्याची अनेक कारणे
मतदानाला का गेले नाही, असा थेट प्रश्न विचारला असता अनेकांनी प्रचंड ऊन्ह होते. उन्हात मतदानात जायचे कसे, असा उलट सवाल केला. कोणी निवडूण आला तरी काय फरक पडतो, असे सांगणारेही महाभाग दिसून आले. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे आणि मतदार यादीत नावच सापडले नाही, असे सांगणारेही मतदार आहेत. मतदान टाळण्याचे कारणे सांगून लोकशाहीच्या उत्सवात ही मंडळी सहभागी झाली नाही.

Web Title: Lok Sabha Election 2019; Fifteen lakh voters are recruited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.