Lok Sabha Election 2019; भाजप सरकारच्या काळातच सर्वाधिक जनहितार्थ निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:14 PM2019-04-04T21:14:01+5:302019-04-04T21:15:20+5:30

केंद्र आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी, चौवीस तास वीज, मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प सुध्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

Lok Sabha Election 2019; Highest public interest decision in BJP government | Lok Sabha Election 2019; भाजप सरकारच्या काळातच सर्वाधिक जनहितार्थ निर्णय

Lok Sabha Election 2019; भाजप सरकारच्या काळातच सर्वाधिक जनहितार्थ निर्णय

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : गोंदिया येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी, चौवीस तास वीज, मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प सुध्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. तर बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्याचे काम केले. भाजप सरकारच्या काळातच सर्वाधिक जनहितार्थ निर्णय घेण्यात आल्याचा दावा ऊर्जा मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भाजप सेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवारी (दि.३) पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची गोंदिया येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
या वेळी प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे नेते डॉ. दीपक सावंत, खा.डॉ.विकास महात्मे, आ.डॉ.परिणय फुके, अनिल सोले, विजय रहांगडाले, बाळा काशिवार, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपेंद्र कोठेकर, माजी. खा.खुशाल बोपचे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे उपस्थित होते. राजकुमार बडोले म्हणाले, युती सरकारच्या काळातच या दोन्ही जिल्हाचा खऱ्या अर्थाने सर्वांगिन विकास झाला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरूवात केल्याने यातील गैरप्रकाराला आळा बसला. तर झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प सुध्दा आता मार्गी लावला जात असल्याचे सांगितले. परिणय फुके म्हणाले, काँग्रेसला जे काम मागील ७० वर्षांत करता आले नाही ते काम भाजप सरकाने केवळ ७० दिवसात पूर्ण केले. नझुल पट्टेधारकांना मालकीे हक्क पट्टे मिळवून देण्याचे व भूमीधारीचे भूमीस्वामी करुन सातबारा उपलब्ध करुन देण्याचे महत्त्वपूर्ण भाजप सरकारने केल्याचे सांगितले.
विजय रहांगडाले म्हणाले, धापेवाडा, पिंडकेपार हे प्रकल्प मार्गी लावून शेतकऱ्यांना सिंचनात समृध्द करण्याचे काम केल्याचे सांगितले. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी सुनील मेंढे यांचे हात बळकट करण्यास सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Highest public interest decision in BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.