Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणणारे शेतकरी हितैशी कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 10:13 PM2019-04-06T22:13:30+5:302019-04-06T22:14:44+5:30
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक विकास झाला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन भाजप सरकार स्वत:ला शेतकरी हितेशी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक विकास झाला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन भाजप सरकार स्वत:ला शेतकरी हितेशी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणणारे भाजप सरकार शेतकरी हितैशी कसे? हे जनतेच ठरवावे, तसेच अशा नौटंकीबाज सरकारला धडा शिकवावा, असे प्रतिपादन वर्षा पटेल यांनी केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ शनिवारी (दि.६) तुमसर तालुक्यातील आष्टी, चिखला, येरली, माडगी येथे आयोजित प्रचारला सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. वर्षा पटेल म्हणाल्या, भाजप सरकारचे नेते जुमेलबाजी करण्यात ऐवढे पुढे गेले आहेत की त्यांना त्यांच्या जेष्ठ नेत्यांचा सुध्दा विसर पडला आहे. भाजप नेते ७० वर्षे काँग्रेसने देशाची लूट केल्याचा आरोप करीत. मात्र या कालावधीत तीन वेळा अटल बिहारी वाजपेयी हे सुध्दा पंतप्रधान असल्याचा त्यांना विसर पडला आहे. भाजप नेत्यांनाच त्यांच्या आदरणीय नेत्यांचा विसर पडत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मागील पाच वर्षांत गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या विमानात बसून गोंदिया येथे आले ते विमानतळ सुध्दा आघाडी सरकारच्या कार्यकाळात खा. प्रफुल्ल पटेल यांनी तयार केले. तर मोदी सरकारने गोसीखुर्द प्रकल्पाचा निधी रोखला, भेल सारखा महत्त्वपूर्ण प्रकल्प रद्द करुन या दोन्ही जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले. त्यामुळे अशा जुमलेबाज भाजप सरकारचा खरा चेहरा जनतेपुढे आला असून जनताच या निवडणुकीत त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांना साथ देण्याचे आवाहन केले.