Lok Sabha Election 2019; मिश्रा यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 09:56 PM2019-04-07T21:56:30+5:302019-04-07T21:57:40+5:30

येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थसारथी मिश्रा यांनी शनिवारी (दि.६) अर्जुनी-मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीच्या दृष्टीने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

Lok Sabha Election 2019; Mishra reviewed the election preparation | Lok Sabha Election 2019; मिश्रा यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

Lok Sabha Election 2019; मिश्रा यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

Next
ठळक मुद्देअर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र : अधिकाऱ्यांना दिल्या मतदानासाठी टिप्स

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थसारथी मिश्रा यांनी शनिवारी (दि.६) अर्जुनी-मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीच्या दृष्टीने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तहसीलदार विनोद मेश्राम, सडक -अर्जुनीच्या तहसीलदार उषा चौधरी, नोडल अधिकारी नाईनवाड, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, नायब तहसीलदार पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ.मिश्रा यांनी, मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाºया दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला व इतर मतदारांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करु न द्याव्यात. समाजमाध्यमांवर लक्ष दयावे. चुकीच्या त्यावर कुठल्याही पोस्ट येणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणी मतदानावर बहिष्कार टाकत असेल तर त्यांना भेटून बहिष्कार मागे घेण्याबाबत विनंती करावी. बहिष्कार टाकणे ही चांगली बाब नाही. पोलीस विभागाने निवडणुकीच्या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. हा भाग नक्षलग्रस्त असला तरी शंभर टक्के मतदान कसे होईल यादृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती जास्तीतजास्त करावी. अवैध दारु चा पुरवठा व विक्र ी निवडणुकीच्या काळात होणार नाही यासाठी धाडसत्र मोहीम राबवावी असे त्यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी सोनाळे यांनी, जास्तीतजास्त मतदान व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार जागृतीचे विविध उपक्र म राबविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.
या मतदारसंघात आदिवासी, अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग मतदारांचे प्रमाण मोठ्या संख्येत असल्याचे सांगितले. या विधानसभा क्षेत्रात २९५ गावे येत असल्याचे सांगत त्यांनी ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटबाबत मतदार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक करु न दाखिवण्यात आली आहे. मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे. नविन मतदारांची नोंदणी करु न त्यांचे मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्ज भरु न घेण्यात आले आहे.
बीएलओचे व सखी बुथचे वेगळे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या विधानसभा क्षेत्रात काही गावे नक्षलग्रस्त असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत अशी राहणार आहे. ३१ मतदान केंद्रांवर वेबकास्टींग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले यांनी, निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था चोख राहील यादृष्टीने तयारी केली असून नक्षलग्रस्त भागात शंभर टक्के मतदान कसे होईल यासाठी जास्तीतजास्त मतदारांना प्रोत्साहित करणार असल्याचे सांगितले.

स्ट्रॉँगरूमला दिली भेट
कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या स्ट्राँग रु मला डॉ.मिश्रा यांनी भेट देऊन पाहणी केली. कुठल्याही त्रुटी स्ट्राँगरु म व त्या परिसरात राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. नवेगावबांध येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्र क्र मांक १९३ आणि १९३ ला भेट देऊन पाहणी केली. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रावर कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घेण्याबाबतच्याही सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Lok Sabha Election 2019; Mishra reviewed the election preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.