Lok Sabha Election 2019; जाहीर प्रचार बंद आता गृहभेटीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:21 PM2019-04-08T22:21:48+5:302019-04-08T22:23:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता ...

Lok Sabha Election 2019; The publicity ban is now filled with homage | Lok Sabha Election 2019; जाहीर प्रचार बंद आता गृहभेटीवर भर

Lok Sabha Election 2019; जाहीर प्रचार बंद आता गृहभेटीवर भर

Next
ठळक मुद्देआज प्रचारतोफा थंडावणार, प्रशासन सज्ज : १३ हजार २९२ अधिकारी, कर्मचारी तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहे. त्यामुळेच सोमवारी (दि.८) सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रॅली काढून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. तर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दोन हजार १८४ मतदान केंद्रांवर १३ हजार २९२ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे, भाजपाचे सुनील मेंढे, बसपाच्या डॉ. विजया नंदुरकर यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. २९ मार्चपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झाली होती. निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजेच मंगळवारी सायंकाळी ६ वाजतापासून प्रत्यक्ष प्रचार थांबणार आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात १८ लाख आठ हजार ९४८ मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. मतदानासाठी दोन १८४ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे.
१३ हजार २९२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण पूर्ण झाले असून १० एप्रिल ला सकाळी पोलिंग पार्टी मतदान केंद्रासाठी साहित्य घेवून रवाना होणार आहे. निवडणुकीसाठी २५६८ बॅलेट युनिट, २५३० कंट्रोल युनिट आणि २७०० व्हीव्हीपॅट सज्ज आहेत.
आचारसंहितेचे कडक अंमलबजावणी
निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहितेचे कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. या दरम्यान २९२ वाहन, ४२ रॅली, २६४ लाऊडस्पिकर,१८४ बैठका, १५ हेलीपॅडला परवानगी देण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात २२ एफएसटी, २४ एसएसटी, ३२ व्हीएसटी, ९ व्हीव्हीटी टीम तैनात आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून मतदारांनी मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
८१ लाखाची रोकड जप्त
निवडणूक आचारसंहिता घोषीत झाली तेव्हापासून पोलीस विभागाच्यावतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान वाहन तपासणीतून ८१ लाख ५० हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच निवडणूक काळात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २४ हजार २६७ लीटर दारू जप्त करण्यात आली आहे.
सीव्हीजीलवर २२९ तक्रारी
निवडणूक आयोगाने नागरिकांच्या सुविधेसाठी व तक्रार निवारण्यासाठी विविध फ्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. त्याद्वारे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यात आला आहे. यात एनजीआरएस ११७, कॉलसेंटर २८६, सीव्हीजील ११९ असे ४२२ तक्रारींचा समावेश आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; The publicity ban is now filled with homage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.