Lok Sabha Election 2019; खासदारांच्या निवडणुकीवर आमदारांचे रिपोर्ट कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:35 PM2019-03-30T23:35:31+5:302019-03-30T23:36:20+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे प्रगतीपत्रक आणि विजयावरुन विधानसभेचे तिकीट निश्चित होणार आहे. त्यामुळे जेवढी चिंता या निवडणुकीची उमेदवाराला नसेल त्यापेक्षा अधिक काळजी विद्यमान आमदारांना असल्याने ते प्रचारासाठी रात्रंदिवस एक करीत आहे.

Lok Sabha Election 2019; Report card of MLAs on MP's election | Lok Sabha Election 2019; खासदारांच्या निवडणुकीवर आमदारांचे रिपोर्ट कार्ड

Lok Sabha Election 2019; खासदारांच्या निवडणुकीवर आमदारांचे रिपोर्ट कार्ड

googlenewsNext
ठळक मुद्देचांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न : गावात वाढला मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे प्रगतीपत्रक आणि विजयावरुन विधानसभेचे तिकीट निश्चित होणार आहे. त्यामुळे जेवढी चिंता या निवडणुकीची उमेदवाराला नसेल त्यापेक्षा अधिक काळजी विद्यमान आमदारांना असल्याने ते प्रचारासाठी रात्रंदिवस एक करीत आहे. एकंदरीत निवडणूक खासदाराची असली तरी बिपी मात्र आमदारांचा वाढला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात गोंदिया,अर्जुनी मोरगाव, तिरोडा, भंडारा, साकोली आणि तुमसर या सहा मतदार संघाचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सहा पैकी पाच आमदार भाजपाचे निवडून आले तर गोंदिया विधानसभेत एकमेव काँग्रेसचा आमदार निवडून आला. मागील दोन दशकांपासून गोंदिया विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सुध्दा आपली जागा कायम ठेवण्यासाठी सर्वाधिक टेशंन भाजपा आमदारांना आहे. अर्जुनी मोरगाव, तुमसर आणि साकोली मतदार संघात भाजपाचे दमदार आमदार असतांना सुध्दा भाजपाचा उमेदवार पराभूत झाल्याने या आमदारांना आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडले.पोटनिवडणूक असल्याने पक्षांने सुध्दा ही बाब गांर्भियाने घेतली नाही. मात्र नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकल्यानंतर हा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यातून हिरावला गेला. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी अधिक प्रतिष्ठेची आहे. तर राष्टÑवादी काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवण्याचे खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर सुध्दा आवाहन आहे. त्यासाठीच प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल मागील काही दिवसांपासून हा मतदारसंघ पूर्णपणे पिंजून काढत आहे. सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होणार असल्याने गोंदियाचे आ. गोपालदास अग्रवाल यांनी सुध्दा प्रचार दौरा सुरू केला असून आघाडीच्या उमेदवारासाठी मतांचा जोगावा मागत आहे. मात्र भाजपाच्या पाच आमदारांसाठी लोकसभेची ही निवडणूृक अतिशय महत्त्वपूर्ण असून या निवडणुकीतूनच विधानसभेची इंनिग खेळली जाणार आहे. त्यामुळे ते सुध्दा दिवसरात्र एक करुन मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे.उमेदवार किंवा पक्षाकडून काही मदत मिळो अथवा न मिळो स्वत:ची पुंजी लावून पक्षाचा उमेदवाराचा प्रचार करताना सुध्दा काही आमदार दिसत आहे. त्यामुळे आमदारांनी ही निवडणूक चांगलीच मनावर घेतल्याचे चित्र आहे. या मागील कारण देखील तसेच लोकसभेच्या निवडणुकीवरच विधानसभेसाठी प्रगतीपत्रक ठरणार आहे. त्यामुळे गुणवत्ता यादीत उर्तीण होण्यासाठी आमदार जीवाचा आटापिटा करीत आहे. याच प्रगतीपत्रकावरुन त्यांचा मुंबईत पुन्हा जाण्याचा रस्ता मोकळा होणार आहे.

पालकमंत्र्याच्या मतदारसंघातूनच राष्ट्रवादीला आघाडी
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे ४२ हजार मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व असताना सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तर पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मतदार संघातून कुकडे यांना आघाडी मिळाली होती. गोंदिया,तुमसर आणि साकोली मतदार संघातून सुध्दा कुकडे यांना आठ ते दहा हजार मतांची आघाडी मिळाली होती हे विशेष.

Web Title: Lok Sabha Election 2019; Report card of MLAs on MP's election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.