Lok Sabha Election 2019; महारांगोळीतून मतदार जनजागृतीचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:30 PM2019-04-08T22:30:47+5:302019-04-08T22:38:07+5:30
येत्या ११ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात मतदान घेण्यात येणार आहे. यात शंभर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत सोमवारी सकाळी ९ वाजता स्थानिक इंदिरा गांधी क्रीडा संकुलच्या मैदानावर भव्य १६ हजार ९०० चौरस फुटाची महारांगोळी साकरण्यात आली.या रांगोळीत मतदार जनजागृती व ईव्हीएम, व्हीव्हीटी पॅटची माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या ११ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात मतदान घेण्यात येणार आहे. यात शंभर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत सोमवारी सकाळी ९ वाजता स्थानिक इंदिरा गांधी क्रीडा संकुलच्या मैदानावर भव्य १६ हजार ९०० चौरस फुटाची महारांगोळी साकरण्यात आली.या रांगोळीत मतदार जनजागृती व ईव्हीएम, व्हीव्हीटी पॅटची माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ही रांगोळी साकारण्यासाठी विविध रंगांच्या रांगोळीचा कलावंतांनी वापर केला. महारांगोळीमध्ये गोंदिया जिल्ह्याचा नकाशा तयार करुन त्यामध्ये भारतीय संसद, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन, दिव्यांग मतदार,महिला आणि शेतकरी मतदार साकारण्यात आले. जास्तीत जास्त दिव्यांग मतदाराला प्रोत्साहित करण्यावर रांगोळीत भर देण्यात आला.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी देखील रांगोळी साकारण्यास आपला हातभार लावला. शिक्षणाधिकारी उल्हास नरड, गटशिक्षणाधिकारी एल.एम.मोहबंशी, गट समन्वयक विनोद पलोके, केंद्र प्रमुख बी.डी.डोंगरे, डी.बी.खोब्रागडे, कृष्णाओम फुन्ने, विजय ढोकणे, बाळकृष्ण बिसेन यांनी सहकार्य केले. सत्य साई संघटनेने कार्यक्रम स्थळी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन दिली होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.
कला पथकाने वेधले लक्ष
सुभाष बहुउद्देशीय संस्थेचे सुभाष मेश्राम व त्यांच्या सहकलावंतांनी कला पथकाच्या माध्यमातून मतदानाबाबत मतदान जागृतीचा संदेश दिला. महारांगोळी साकारण्यात कुलदीपीका बोरकर, प्रकाश भैरम, अरुण रामटेके, नागसेन भालेराव, शिवलाल टांक, रिसकलाल वेगड, रश्मी बिसेन, अविनाश गोंदोळे, अरुण नशिने, इरफान कुरेशी, विकास कोहाड, बालचंद राऊत, आदित्य अग्रवाल, यशोधरा सोनवाने, स्नेहलक्ष्मी साठवणे, आरती सतदेवे, जयश्री तरोणे, निर्मला नेवारे, स्नेहल ब्राम्हणकर, शशिकला डोंगरवार, उषा नरुळे, मयूर गोहळ, योगिता येळणे, आकांक्षा मेनन, कविता मेश्राम, किंजल परमार, तसेच माविमच्या सहयोगिनी यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी तयार केली मानवी श्रृखंला
मतदान जागृतीचा संदेश देणाऱ्या महारांगोळीच्या कार्यक्र माला विवेक मंदिर, गुरुनानक शाळा, महावीर मारवाडी शाळा, एस.एस.गर्ल्स कॉलेज, एस.एस.गर्ल्स स्कूल, मुन्सीपल कॉन्व्हेट, मनोहर मुन्सीपल हायस्कूल, मनोहर मुन्सीपल हायर सेकंडरी स्कूल, राजस्थान कन्या विद्यालय,गुजराती नॅशनल स्कूल, रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, सरस्वती महिला विद्यालय आणि जिल्हा परिषद कटंगी येथील २३३८ विद्यार्थी आपल्या शाळेतून रॅलीद्वारे मतदार जागृतीचा संदेश देत स्टेडियममध्ये पोहचले. महारांगोळीच्या सभोवताल उपस्थित विद्यार्थ्यांनी मानवी श्रृंखला तयार केली होती.
प्रलोभनाला बळी पडणार नाही
रांगोळी काढण्यात आलेल्या परिसरात स्वाक्षरी अभियानाच्या फलकावर मी योग्य उमेदवाराची निवड करणार, मी मतदानासाठी प्रलोभनाला बळी पडणार नाही, या वेळी शंभर टक्के मतदान करणार अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देवून त्यावर स्वाक्षरी केली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील घोषवाक्य देखील या फलकावर लिहिली.या वेळी विविध रंगांचे फुगे आकाशात सोडण्यात आले.