Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 08:11 PM2019-04-06T20:11:33+5:302019-04-06T20:12:25+5:30

जुमलेबाजीे करणाऱ्या मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी करणार ते सांगा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

Lok Sabha Election 2019; What is the promise of doubling the income of farmers? | Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय?

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय?

Next
ठळक मुद्देगोरेगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी देशातून भ्रष्टाचार दूर करु, विदेशातील काळा पैसा परत आणू, डिजीटल इंडियाचे स्वप्न साकारु आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही मोदी सरकारने एकाही आश्वासनाची पुर्तता केली. जुमलेबाजीे करणाऱ्या मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी करणार ते सांगा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोरेगाव येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत भाजप सरकारने विविध आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच सरकारला या सर्व आश्वासनांचा विसर पडला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारला आता अच्छे दिनचे काय झाले याचे असा सवाल जनतेनी करावा. केवळ निवडणुका आल्या की राम मंदिराचा मुद्दा पुढे करायचा आणि मतांचे राजकारण करायचे हेच काम मोदी सरकार करीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे दूरच राहिले उलट जाहीर केलेल्या कर्जमाफीचा सुध्दा अद्यापही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर संविधानाच्या प्रतिकात्मक प्रती जाळण्यात आल्या तेव्हा देशाचा चौकीदार कुठे होता असा सवाल ही जयंत पाटील यांनी केला. त्यामुळे अशा विश्वासघाती आणि जुमलेबाज सरकारला धडा शिकविण्यासाठी नाना पंचबुध्दे यांचे हात बळकट करण्यास सांगितले. येत्या ११ एप्रिलला सजगपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

Web Title: Lok Sabha Election 2019; What is the promise of doubling the income of farmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.