‘लोकमत रक्ताचं नातं’ रक्तदान मोहीम २ जुलैपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:24+5:302021-06-30T04:19:24+5:30
कोरोनाकाळात रक्तदान शिबिरावरही परिणाम झाला. त्यामुळे रक्तदानाची कमतरता जाणवायला लागली. आता ती कमतरता भरून काढण्यासाठी ही रक्तदान मोहीम आयोजित ...
कोरोनाकाळात रक्तदान शिबिरावरही परिणाम झाला. त्यामुळे रक्तदानाची कमतरता जाणवायला लागली. आता ती कमतरता भरून काढण्यासाठी ही रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमात सर्वांनी रक्तदान हेच महान कार्य ही भूमिका घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. रक्त हे कोणत्याही कृत्रिम पदार्थापासून तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तसंकलनाशिवाय पर्याय नाही. गोंदिया शहरासह तालुक्यातही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराला विविध सामाजिक आणि राजकीय सहकार्य करण्याकरिता युवा वर्ग तसेच सखी मंच सदस्य व वाचकवर्ग यांनी पुढे येऊन महान रक्तदान शिबिराला यशस्वी करण्याचे आवाहन लोकमत गोंदिया जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा यांनी केले आहे. जिल्ह्यातील लोकमत सखी मंच सदस्य तसेच वाचकवर्ग यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.