आजपासून लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी

By admin | Published: February 21, 2016 01:03 AM2016-02-21T01:03:51+5:302016-02-21T01:03:51+5:30

लोकमत सखी मंच सन २०१६ जिल्हास्तरीय सदस्यता नोंदणी आजपासून उत्स्फूर्तपणे सुरू होत आहे.

Lokmat Sakhi Forum member registration from today | आजपासून लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी

आजपासून लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी

Next

बक्षिसांची सुवर्णसंधी : तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी येथे सखींची झुंबड
गोंदिया : लोकमत सखी मंच सन २०१६ जिल्हास्तरीय सदस्यता नोंदणी आजपासून उत्स्फूर्तपणे सुरू होत आहे. यास वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखी मंच सदस्य होऊ शकतात. महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेले महिलांचे हक्काचे व्यासपीठ लोकमत सखी मंचच्या सदस्यता नोंदणीस कार्यालयता गर्दी होत आहे. सखी मंच सदस्यत्व स्वीकारुन सखी मंचतर्फे बक्षिसांच्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.
सदस्यता नोंदणीस महिलांचा प्रतिसाद बघता लोकमत कार्यालयात सदस्यता नोंदणी सुरु करण्यात आली आहे. ज्या महिलांना सखी मंच सदस्यत्व घ्यावयाचे आहे. त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावी. संसाराच्या रणगाड्यात गुरफटलेल्या महिलांना स्वत:कडे लक्ष घ्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांचा संपूर्ण वेळ घर व कुुटुंबासाठी जातो. सखींमध्ये लपलेले कलागुण शोधण्यासाठी लोकमतने सामाजिक जाणीव ठेवून महिलांसाठी सखी मंच हे व्यासपीठ दिले आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून लोकमतकडून महिलांना ज्ञान, सांस्कृतीक, सामाजिक, मनोरंजन, स्पर्धा, खेळ, व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळेच सखींच्या पसंतीत उतरलेल्या सखी मंचचे सभासद होण्यासाठी दरवर्षी महिला उत्सूक असतात. २०१६ च्या सदस्य नोंदणीस सुरूवात झाली असून सदस्य नोंदणी करताच प्रत्येक सखीला नि:शुल्क आकर्षक भेटवस्तूंची मेजवानी मिळणार आहे. राज्यस्तरीय सोडतीद्वारे भाग्यवान सखीला ह्युंडई आय-१० मिळण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे.
सखी मंच सदस्य गोंदिया शहर विभागाकरिता नवीन सदस्यता ५०० रुपये व जुन्या सदस्यांना ४५० (२०१५) चे कार्ड जमा केल्यास) नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. सखी मंच सदस्य होण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ सर्व सखींनी घ्यावा असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे. अजूनही सदस्यता नोंदणी लोकमत कार्यालय गोरेलाल चौक जुने पोस्ट आॅफिस येथे सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत सुरु राहील. अधिक माहितीसाठी ९८८१०११८२१, ९८२३१८२३६७ व शहरातील वार्डात नोंदणी सुरु आहे. सखींना जो वार्ड जवळ पडतो तिथे जाऊन आपली नोंदणी करावी.
सखी मंच सदस्यता नोंदणी केंद्र- शहर (एक दिवसीय सदस्य नोंदणी येथे सुरू)
१) लोकमत जिल्हा कार्यालय- जुनी पोस्ट आॅफिस इमारत स्टेशन रोड, गोरेलाल चौक, गोंदिया. दूरध्वनी क्रमांक ९८८१०११८२१, ९८२३१८२३६७
२) गणेश नगर- मीना डुंभरे- ९४२२८३२८०२, दीपा काशिवार- ९४९४११७६६३
३) सिव्हील लाईन्स- हनुमान मंदिराजवळ - भावना कदम - ९४२३६८९४७७
४) विवेकानंद कॉलनी- योजना कोतवाल- ८४८२८१५८५०
५) गोविंदपूर- एरीकेशन आॅफिस, जोगळेकर वॉर्ड-योगिनी पाथ्ये- ८६५७७८८४३३
६) रामनगर- आयुष हॉस्पिटल- प्रज्ञा मेहता- ९०९६५२२२४६
७) विजय नगर- आकांक्षा ब्युटी पार्लर, पद्मिनी उके- ९६०४७८०८२२
८) टि.बी. टोली- परमात्मा नगर- सीमा बैतुले - ८८८८४४५९६४
९) ग्राम कटंगी - हिमेश्वरी कावडे - ८५५२८३७७६४
१०) वसंत नगर- नंदा राऊत- ९४२०९३७७९९
सखी मंच सदस्यता नोंदणी व माहिती केंद्र - ग्रामिण
१) देवरी - शिल्पा तिराले - ९७६५३३२७४२
२) आमगाव- मॉ बम्लेश्वरी आॅनलाईन अँड झेरॉक्स- राजू फुंडे - ८८८८८९३६६० वर्षा शर्मा- ८९५६६४४२६६
३) सालेकसा- किरण मोरे- ९०११७७०८१०
४) मोरगाव-अर्जुनी- नंदिनी धकाते - ९४२०६१९८६
५) सडक-अर्जुनी- हर्षा राऊत- ७७९८३०५५७५
६) सौंदड - गायत्री इरले- ९४२३६४०४३०
७) गोरेगाव- वैशाली कोटेवार- ९०४९६४०५८३
८) तिरोडा- ममता दुबे- ९२७२८९६६०१

Web Title: Lokmat Sakhi Forum member registration from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.