लोकमत टॅलेन्ट सर्च परीक्षा ६ डिसेंबरला

By admin | Published: November 29, 2015 02:42 AM2015-11-29T02:42:30+5:302015-11-29T02:42:30+5:30

पेस आयआयटी अ‍ॅन्ड मेडिकल नागपूर व लोकमत बाल विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने वर्ग ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्याकरिता ...

Lokmat Talent Search Examination on 6th December | लोकमत टॅलेन्ट सर्च परीक्षा ६ डिसेंबरला

लोकमत टॅलेन्ट सर्च परीक्षा ६ डिसेंबरला

Next

नि:शुल्क प्रवेश : बक्षिसांची लयलूट
गोंदिया : पेस आयआयटी अ‍ॅन्ड मेडिकल नागपूर व लोकमत बाल विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने वर्ग ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्याकरिता लोकमत टॅलेन्ट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी ही परीक्षा गोंदिया शहरात घेतली जाणार आहे. यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नसले तरी विजेत्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीसांची लयलूट केली जाणार आहे.
ही परीक्षा वर्गनिहाय घेतली जाणार आहे. स्टेट बोर्ड, सीबीएसई व आयसीएसई मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता बोर्डानिहाय परीक्षा घेतली जाईल. सदर परीक्षेत मागील वर्षी शिकलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ १० वीच्या विद्यार्थ्यांला ९ वीच्या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारण्यात येतील.
या परीक्षेत गणितावर-२० प्रश्न, भौतिकशास्त्रावर-१० प्रश्न, रसायनशास्त्रावर-१० प्रश्न, जीवशास्त्रावर-१० तर बौध्दीक चाचणीवर-१० असे प्रश्न विचारण्यात येतील. सर्व प्रश्न बहुपर्यायी (आॅप्शनल) स्वरूपाचे राहणार असून निगेटीव्ह मार्र्किंग पध्दत राहील. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला काळ्या रंगाच्या बॉल पेनने नोंदवायचे आहे. एकूण ६० प्रश्नांकरिता १ तास ३० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.
सदर परीक्षेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी आपल्या नावाची नोंदणी लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया येथे सकाळी ११ ते १ वाजेच्या दरम्यान फोन क्रमांक २३०५०७ यावर करता येईल. तसेच श्रीकांत पिल्लेवार, जिल्हा संयोजक यांच्याकडे मोबाईल क्रमांक ९८२३१८२३६७ वर व्हाट्सअ‍ॅप किंवा मॅसेज पाठवून करता येईल. नाव नोंदणी करताना विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, वर्ग, बोर्ड ही माहिती देणे आवश्यक आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मागील वर्षाच्या अभ्यासाची व ज्ञानाची उजळणी होणार आहे.

Web Title: Lokmat Talent Search Examination on 6th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.