‘लोकमत’च्या ‘रक्ताचं नातं’ उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:45+5:302021-07-11T04:20:45+5:30

आमगाव : कोरोना संकटकाळात लोकमत समूहाने राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या रक्तदान ...

Lokmat's 'Raktacha Naat' initiative will revive many () | ‘लोकमत’च्या ‘रक्ताचं नातं’ उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळणार ()

‘लोकमत’च्या ‘रक्ताचं नातं’ उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळणार ()

Next

आमगाव : कोरोना संकटकाळात लोकमत समूहाने राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या रक्तदान शिबिरांमध्ये अनेक रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळीच रक्त मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे साहजिकच अनेकांचे प्राण वाचविणे शक्य होणार असून, ‘लोकमत’च्या ‘रक्ताचं नातं’ उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे. ‘लोकमत’चा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी केले.

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते १५ जुलैदरम्यान ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याच अंतर्गत शनिवारी (दि.१०) बनगाव येथील श्री महादेवराव शिवणकर अध्यापक विद्यालय, सरस्वती विद्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, तहसीलदार डी.एस. भोयर, ठाणेदार विलास नाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी विनोद चव्हाण, पोलीस अधिकारी पवार, गटशिक्षणाधिकारी एम.एल. मेश्राम, महिला दक्षता समिती अध्यक्ष जयश्री फुंडकर, शिक्षक सहायक संचालक एन. बी. बिसेन, शिक्षक भारतीचे अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, अन्नपुरवठा अधिकारी मिथुन ठाकरे, माजी प्राचार्य एच.के. फुंडे, प्राचार्य सी. जी. पाऊलझगडे, संजय बहेकार, मधुकर कावळे, महेश उके, रवी क्षीरसागर, बालाराम व्यास, बुधराम हत्तीमारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष इसूलाल भालेकर, सुनील क्षीरसागर उपस्थित होते. शिबिराची सुरुवात स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुद्धा लोकमत समूहाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. लोकमत, लोकमत सखी मंच आणि भारतीय विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. इतरांनासुद्धा रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

.............

शिबिरासाठी यांनी केले सहकार्य

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी लोकमत प्रतिनिधी राजीव फुंडे, तालुका प्रतिनिधी मुरलीधर करंडे, नरेंद्र कावळे, विजय रगडे, गोपाल अग्रवाल, पिंकेश शेंडे, प्रमोद उजवने, विद्या शिंगाडे, संजय मोटघरे, रामेश्वर मारवाडे, सुलाखे, अजय दोनोडे, दिनू थेर, प्रफुल्ल ठाकरे, तीरथ येटरे, राहुल उजवने, प्रशांत गायधने, राजेश बनसोड, डाॅ. धर्मेंद्र टेंभरे, डॉ. कार्तिक मेंढे, सपन उजवने, मंगला सिंगाडे, संजू दोनोडे व लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले. बाई गंगाबाई रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.

Web Title: Lokmat's 'Raktacha Naat' initiative will revive many ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.