गोठ्याला आग लागून अडीच लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:58 PM2019-06-13T23:58:24+5:302019-06-13T23:58:45+5:30
येथील जुन्या वस्तीत गुरूवारी सकाळी ९.३० अचानक लागलेल्या आगीमुळे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. येथील रहिवासी गुलाब कटरे व संजय कटरे यांच्या गोठ्याला अचानक आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील जुन्या वस्तीत गुरूवारी सकाळी ९.३० अचानक लागलेल्या आगीमुळे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
येथील रहिवासी गुलाब कटरे व संजय कटरे यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत ४० पाईप, ट्रॅक्टरचे टायर व तणस जळून खाक झाली. आग एवढी भिषण होती की आगीला आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायतच्या अग्नीशमन कर्मचाऱ्यांना तब्बल चार तास प्रयत्न करावे लागले. या आगीमुळे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.आग विझविण्यासाठी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, नगरपंचायतचे उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले,नगरसेवक रेवेंद्रकुमार बिसेन, गुड्डू कटरे, अंकित रहांगडाले, मोरेश्वर रहांगडाले, संजय बारेवार व नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.आगीच्या घटनेचा पंचनामा तलाठी जी.व्ही.गाढवे यांनी केला.
नि:शुल्क सेवा
गोरेगाव शहरात कुठेही आगीची घटना घडल्यास नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन विनाशुल्क पुरविले जाईल असे नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी सांगीतले.