प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:02+5:302021-07-20T04:21:02+5:30

गोंदिया : चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ढासगड येथे २३ जून रोजी झालेल्या महिलेच्या खुनातील ३ आरोपींना बुटीबोरी (नागपूर) येथून ...

The lover himself killed the beloved | प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

Next

गोंदिया : चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ढासगड येथे २३ जून रोजी झालेल्या महिलेच्या खुनातील ३ आरोपींना बुटीबोरी (नागपूर) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तिघांना येत्या शुक्रवारपर्यंत (दि.२३) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

२३ जून रोजी सकाळी १०.५० वाजता चिचगड येथे मृत निशाचा (बदललेले नाव) मृतदेह रस्त्याच्या बाजूला जंगलात आढळला होता. तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. परंतु ओळख पटली नव्हती. तिला धारदार शस्त्राने गळ्यावर व डोक्यावर वार करून ठार केले होते. या संदर्भात चिचगड पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला होता. छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यातील पोलीस ठाण्यांतून बेपत्ता महिलांची माहितीही घेतली. परंतु काहीच माहिती मिळाली नव्हती. रविवारी (दि.१८) तिची ओळख पटली व गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, दुधा व सायकी या गावात जाऊन समिर असलम शेख (२६,रा. बावलानगर, बुटीबोरी), आसीफ शेरखान पठाण (३५, रा. बाबा मस्तान शॉ वार्ड, भंडारा) व प्रफुल पांडुरंग शिवणकर (२५, रा. दुधा-मांगली, नागपूर) यांना सोमवारी (दि.१९) अटक केली.

या प्रकरणात समीर शेखला विचारपूस केली असता त्याने मृत निशासोबत आपले प्रेमसंबंध होते. तिला पत्नी म्हणून स्वीकारून जुलै २०२० पासून भाड्याच्या खोलीत बुटीबोरी येथे एकत्र राहत होते. परंतु फेब्रुवारी २०२१ मध्ये समीरच्या आई-वडिलांनी दुसऱ्या मुलीशी लग्न जोडून साक्षगंधाचा कार्यक्रम केला होता. निशा अपंग असून तिच्यासोबत समीरचे प्रेमसंबंध असल्याचे घरच्यांना लक्षात आले. तर त्याचे साक्षगंध झाले हे निशाच्याही लक्षात आले म्हणून ती समीरला लग्नासाठी हट्ट करीत होती. यातूनच तिचा २२ जून रोजी सांयकाळी खून केल्याची समिरने कबुली दिली.

Web Title: The lover himself killed the beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.