हृदयघात, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:00 AM2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:39+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. घराबाहेर कुणी पडायचे नसून त्यामुळे बाहेर खाण्याचे प्रमाण १०० टक्के बंद झाले. वेळेवर औषध व घरातील शुद्ध आहार लोकांना मिळू लागला व त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात या रूग्णांचे प्रमाण कमी दिसण्याची दुसरी बाजू म्हणजे बरेचशे रूग्ण त्रास असूनही बाहेर पडत नाहीत.

 Low heart rate, high blood pressure and diabetes | हृदयघात, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण कमी

हृदयघात, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण कमी

Next
ठळक मुद्देआनंदायी वातावरणामुळे बदल : कुटुुंबीयांसोबत योग्य आहार घेण्याचा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील महिनाभरापासून घरातच असलेल्या लोकांना आनंददायी वातावरण व तणावापासून मुक्ती मिळाल्याने या काळात हृदयघात, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण कमी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. कुटुंबीयांसोबत घरातीलच योग्य आहाराचे सेवन होत असल्यामुळे या आजारांत मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे, अशी माहिती हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधने यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. घराबाहेर कुणी पडायचे नसून त्यामुळे बाहेर खाण्याचे प्रमाण १०० टक्के बंद झाले. वेळेवर औषध व घरातील शुद्ध आहार लोकांना मिळू लागला व त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात या रूग्णांचे प्रमाण कमी दिसण्याची दुसरी बाजू म्हणजे बरेचशे रूग्ण त्रास असूनही बाहेर पडत नाहीत.
बराचशा रूग्णांचे आनंददायी जीवन (हॅपीनेस इंडेक्स) वाढल्यामुळे ताण कमी झाला आहे. शिवाय, उच्च रक्तदाब व मधूमेहाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.
‘लॉकडाऊन’च्या काळात अनेक जणांच्या तपासण्या व निदानही कमी झाल्यामुळे रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी दिसून येत आहे. श्वसनाच्या (फुफुस) त्रासामुळे रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. काही रूग्ण रक्ताची गाठ झाल्यामुळे तर काही सरळ इन्फेक्शनमुळे कमजोर हृदय घेऊन दाखल होत आहेत.
काळजी घेऊन आपण कोरोनावर मात करू शकतो यासाठी नियमांचे पालन करावे, असे डॉ. प्रमेश गायधने यांनी सांगीतले.

हृदयरोगींना कोरोनाचा धोका जास्त
हृदयरोगींना कोरोनाचा धोका दुसऱ्यांपेक्षा जास्त असतो. मात्र काळजी व प्रतिबंधात्मक उपायांनी कोरोनाचा टाळला जाऊ शकतो. जुन्या रूग्णांनी हृदयरोगाचा उपचार सुरू ठेवावा व त्यात असलेल्या बदलासाठी डॉक्टरांना फोन लाऊन विचारावे. खूप जास्त त्रास असल्यावरच घर सोडून हॉस्पीटलमध्ये जावे. हृदयरोगींनी औषधींचे ब्रांड बदलू नये याची काळजी घ्यावी. तसे झाल्यास सारख्या मात्रांच्या दुसºया कंपनीची औषधी घेऊ शकतात. फक्त रक्त पातळ करण्याचे औषध बदलता कामा नये. एन्जीओप्लास्टी (स्टेंट) व बायपास झाल्यास रूग्णाने औषध न बदलता सुरू ठेवणे. नियमीत एन्जीओप्लास्टी व एन्जीओग्राफी टाळता येते. छातीत जास्त त्रास्त असल्यास लवकर उपचार करवून घ्यावे. हृदयरोगींना २४ तास ७ दिवस उपचार उपलब्ध आहे.

व्यसनापासून दूर रहा
रूग्णांनी रक्तदाब व मधूमेह रिडींग डॉक्टरांना फोनवर सांगावे. डायलीसीस रूग्णाने किडनीतज्ज्ञांना विचारून डायलीसीस सुरु ठेवावे किंवा पुढे ढकलावे व हृदयरोगींनी उपचार सुरू ठेवावा. हृदयनिकामी झालेल्या रूग्णांनी थोडा व्यायाम सुरू ठेवावा. खाण्यापिण्यात काळजी घ्यावी. सर्व नियमीत शस्त्रक्रिया टाळाव्यात. ‘लॉकडाऊन’मध्ये घरी सिगारेट टाळावेत. सगळ्यांना तंबाखूच्या धुरापासून दूर ठेवावे. दारू टाळावी, दारूची सवय असल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून मदत घ्यावी. लहान मुलांच्या हृदयरोगांची शस्त्रक्रिया असल्यास तज्ज्ञांना विचारावे.

वाफरीन, असिट्रोम, डॉबीगाट्रान आधी औषधांचा उपचार सुरू असलेल्या रूग्णांनी जूनी आयएनआर रक्त तपासणी डॉक्टरांशी संवाद करून सुरु ठेवणे किंवा बदलावे. कोरोनामध्ये पैशांचा तुटवडा असल्यास हृदय तज्ज्ञांना सांगून स्वस्त औषध करून घेणे, रक्तदाब, मधूमेह यांचा उपचार तसाच सुरू ठेवावा. काही गोष्टीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
-डॉ. प्रमेश गायधने
हृदयविकार रोगतज्ज्ञ गोंदिया.

Web Title:  Low heart rate, high blood pressure and diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य