एम. बी. पटेल महाविद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:23+5:302021-07-18T04:21:23+5:30
सालेकसा : आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असलेल्या तालुक्यातील मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयातील एम. ए. इतिहास विषयात ४ ...
सालेकसा : आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असलेल्या तालुक्यातील मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयातील एम. ए. इतिहास विषयात ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. रातुम नागपूर विद्यापीठ, नागपूरद्वारे इतिहास विषयाच्या घोषित झालेल्या निकालात गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक रितेश भवरलाल राऊत याने, व्दितीय क्रमांक क्रिष्णकुमार अर्पण पिहिदे याने, सहावा क्रमांक रिना गोवर्धन लिल्हारे हिने तर दहावा क्रमांक नंदकिशोर चैनसिंग नागपुरे याने पटकाविला आहे.
रितेश राऊत याला स्व. वसंत अच्युत टिके सुवर्ण पदक, तात्या टोपे स्मृती सुवर्ण पदक व स्व. सहदेव सखाराम रामटेके रौप्य पदक मिळाले असून, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे, परीक्षा संचालक प्रफुल साबळे यांच्या हस्ते दीक्षांत सभारंभात प्रदान करण्यात आले. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललित जीवानी, इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. नामदेव हटवार, डॉ. बाबूसिंग राठोड, डॉ. रामकिशन लिल्हारे, प्रा. योगराज थेर व आई-वडिलांना दिले आहे.