जीवनावश्यक वस्तू महाग करुन सामान्य माणसाचे जगणे मुश्कील केले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:50+5:302021-09-26T04:30:50+5:30
तिरोडा : देशातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन पकोडे विकण्यास रोजगार समजणारे केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. ...
तिरोडा : देशातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन पकोडे विकण्यास रोजगार समजणारे केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. दैनंदिन जीवनातील आवश्यक सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. सामान्य माणसाची मिळकत कमी व खर्च वाढल्याने जगणे मुश्कील झाले आहे. जनतेला वेठीस धरू पाहणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
तिरोडा तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्यावतीने केसलवाडा येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांनी गावागावात बुथ कमिटी स्थापन करुन समाजातील सर्व घटकांना त्यात सामील करावे. युवकांचा जास्तीत जास्त समावेश करावा व संघटन मजबूत करावे, असे सांगितले. ग्राम मनोराचे सरपंच राजेश पेशने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत यावेळी पक्षात प्रवेश केला. जैन व शिवनकर यांनी त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले. तसेच पक्षाच्यावतीने कृष्णा मरघडे यांना ट्रायसिकल देण्यात आली. या बैठकीला प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, कैलास पटले, योगेंद्र भगत, राजू एन. जैन, ओमकार लांजेवार, मनोज डोंगरे, सुनीता मडावी, जया धावडे, डॉ. किशोर पारधी, नीता रहांगडाले, जितेंद्र पारधी, किरण बंसोड, संदीप मेश्राम, नासीर धानीवाला, देवेंद्र चौधरी, मनोहर राऊत, रामसागर धावडे, जगदीश बावनथडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.