महामंडळाची बियाणे १२ रूपयांनी महाग

By admin | Published: June 4, 2017 12:52 AM2017-06-04T00:52:15+5:302017-06-04T00:52:15+5:30

महामंडळाकडून महाबीजचे देण्यात येणारे १००१ या धानाचे वाण ३२ रूपये किलो दराने विक्री केले जात आहे.

Mahamandal seeds cost dearly 12 rupees | महामंडळाची बियाणे १२ रूपयांनी महाग

महामंडळाची बियाणे १२ रूपयांनी महाग

Next

खासगी कंपन्यांकडून २० रूपये किलो : महागड्या बियाण्यांनी शेतकऱ्यांची पंचाईत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महामंडळाकडून महाबीजचे देण्यात येणारे १००१ या धानाचे वाण ३२ रूपये किलो दराने विक्री केले जात आहे. तर हेच धान खासगी कंपन्यांकडून २० रूपये किलो दराने विक्री केले जात आहे. शासनाचे महामंडळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी की लुबाडण्यासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकच धान खासगी कंपन्याकडून १२ रूपये कमी किंमतीत मिळत असल्याने महाबीजचे महागडे बियाणे कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गोंदिया जिल्ह्यासाठी विविध जातीचे १३ हजार ७७८ क्विंटल धान विक्रीसाठी आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यात पीकेव्ही एचएमटीचे एक हजार ६३५ क्विंटल, स्वर्णा ७५० क्विंटल, पीकेव्ही किसान १५५ क्विंटल, आयआर-६४ चे ३४८ क्विंटल, एमटीयू १०१० चे आठ हजार ७७ क्विंटल, एमटीयू १००१ चे एक हजार १४ क्विंटल, जेजीएल-१७९८ चे ६०० क्विंटल, श्रीराम ८३५ क्विंटल, डिआरके-२ चे १८५, सह्यांद्री १५ क्विंटल, सह्यांद्री ३ चे १० क्विंटल, सह्यांद्री ४ चे ५ क्विंटल, कर्जत-३चे ९० क्विंटल, आरटीएन-५चे ५९ क्विंटल असे एकूण १३ हजार ७७८ क्विंटल बियाणांचा जिल्ह्याला पुरवठा करण्यात आला.
या बियाण्यांमध्ये १००१ हे बियाणे ३२ रूपये किलो दराने महामंडळाकडून विक्री केले जात आहे. खासगी कंपन्यांकडून कमी दरात विक्री होणारे वाण असताना महामंडळाचे महागडे वाण कोण घेईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे.

५० टक्के अनुदानासाठी ७१४ क्विंटल बियाणे
खरीप हंगामासाठी ५० टक्के अनुदानावर एमटीयू १०१० हे धानाचे वाण जिल्हा निधी योजनेतून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना ७१४ क्विंटल धानाची बियाणे ५० टक्के अनुदानावर दिले जाणार आहेत. यात गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १२० क्विंटल, आमगाव ८० क्विंटल, तिरोडा १०० क्विंटल, गोरेगाव ८४ क्विंटल, सडक-अर्जुनी ९० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव ९० क्विंटल, सालेकसा व देवरी प्रत्येकी ७५ क्विंटल बियाणे अनुदानावर द्यायचे आहेत. २८०० रूपये किंमतीचे असलेले धान्य ५० टक्के अनुदानावर म्हणजे १४०० रूपयात देण्यात येत आहेत. एमटीयू १०१० या धानाचे बियाणे २५ किलो पंचायत समितीमधून ३५० रूपये किमतीला मिळत आहे. परंतु हेच धान कृषी केंद्रांमधून ७०० रूपये किंमतीला विक्री करण्यास भाग पडत असल्याने शेतकऱ्यांच्या या अनुदानामुळे कृषी केंद्र चालक संतापले आहेत. त्यामुळे ही बियाणे परत करण्याचा नाद कृषी केंद्र चालकांचा आहे. १९ लाख ९९ हजार २०० रूपयांची बियाणे अनुदानावर या जिल्ह्यात दिली जाणार आहेत.

Web Title: Mahamandal seeds cost dearly 12 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.