महाराणी अवंतीबाई सर्व भारतीयांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:02 AM2018-04-07T01:02:54+5:302018-04-07T01:02:54+5:30
वीरांगणा महाराणी अवंतीबाई यांनी इंग्रजी राजवटी विरोधात तीव्र लढा दिला. तसेच त्यांना परतावून लाव्ांण्याचे काम केले. त्यांचे कार्य कुणीही विसरु शकणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वीरांगणा महाराणी अवंतीबाई यांनी इंग्रजी राजवटी विरोधात तीव्र लढा दिला. तसेच त्यांना परतावून लाव्ांण्याचे काम केले. त्यांचे कार्य कुणीही विसरु शकणार नाही. समस्त भारतीयवासीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान कधीेच विसरणार नाही. त्या केवळ लोधी समाजाच्या नव्हे संपूर्ण भारतीयांच्या गौरवाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते विशाल अग्रवाल यांनी येथे केले.
लोधी अमर शहीद वीरांगणा महाराणी अवंतीबाई यांच्या १६० व्या बलिदान दिनानिमित्त लोधी समाजबांधवातर्फे कारंजा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अमर वºहाडे, शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अपुर्व अग्रवाल, प.स.सदस्य योगराज उपराडे, सरपंच धनवंता उपराडे, उपसरपंच महेंद्र सहारे, माजी सरपंच मंगला रणदिवे, मिताराम हरडे, पोलीस पाटील अल्का रंगारी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विजय वाहाडे उपस्थित होते. विशाल अग्रवाल म्हणाले, महाराणी अवंतीबाई यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांचे नाव सुर्वण अक्षरात लिहिले जायला पाहिजे. राणी अवंतीबाई या केवळ लोधी समाजाच्या नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे गौरव आहेत. अमर वºहाडे म्हणाले महाराणी वीरांगणा अवंतीबाई यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान विसरणे शक्य नाही. त्यांनी इंग्रजी राजवटी विरोधात लढा उभारुन त्यांना परतावून लावण्याचे काम केले. त्या केवळ लोधी समाजबांधवाच्या प्रेरणास्थान नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे प्रेरणा स्थान असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.