व्यापार-उद्योग विकासासाठी महाराष्ट्र चेंबर सहकार्य करेल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:29+5:302021-02-14T04:27:29+5:30
गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशन, एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन, राईल मिलर्स असोसिएशन व सीए व कर सलागार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ...
गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशन, एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन, राईल मिलर्स असोसिएशन व सीए व कर सलागार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यापारी-उद्योजक व व्यावसायिकांच्या विशेष सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी राजेंद्र बग्गा, अशोक अग्रवाल, हुकूमचंद अग्रवाल, सीए सुशील सिंघानीया, संदीप भंडारी, विनय अकुलवार उपस्थित होते. ललित गांधी पुढे म्हणाले, राज्याच्या व्यापार-उद्योग क्षेत्राची शिखर संस्था या नात्याने ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ गेल्या ९४ वर्षापासुन कार्यरत आहे. या महत्वपूर्ण संस्थेच्या संपर्काचा व उपलब्ध साधनांचा गोंदिया जिल्ह्यातील व्यापार-उद्योगाच्या विकासासाठी आम्ही उपयोग करू असे सांगितले. सीए सुशिल सिंघानीया यांनी जीएसटी कर प्रणालीतील त्रुटींचा आढावा घेतला. एमआयडीसी असोसिएशनचे हुकूमचंद अग्रवाल यांनी एमआयडीसीतील आवश्यक सुविधांच्या अपेक्षा मांडल्या, विशेषतः एमआयडीसी व ग्रामपंचायतीचा दुहेरी कर, फुड प्रोसेसिंगमधील प्रलंबित अनुदान याविषयी तात्काळ निर्णय व्हावा अशी मागणी केली. अशोक अग्रवाल यांनी परराज्यातील धान येताना येणाऱ्या अडचणी, गोंदीया, वाशिम नवीन जिल्ह्यांबाबतीत कर प्रणालीच्या त्रुटीमुळे लागणारी दुहेरी स्टॅम्प ड्युटी, औद्योगिक बिगरशेती आदि महत्वाचे मुद्दे मांडले. यावेळी झालेल्या चर्चेत किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीचंद रोचवाणी, शंकरलाल अग्रवाल, होलसेल क्लॉथ ट्रेडर्स असो. चे अध्यक्ष दिनेश जैन, रीटेल क्लॉथ ट्रेड असो. चे बलराज कुंगवाणी यांनी सहभाग घेतला व फुड सेफ्टी अॅक्ट, सुलभ करप्रणाली औद्योगिक कर्जावरील फी चे दर इत्यादी विषय मांडला. सीए सुशिल अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक अग्रवाल यांनी आभार मानले.