Maharashtra Election 2019 ; डांर्गोली सिंचन प्रकल्पामुळे शेतकरी समृद्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:15+5:30

भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळे म्हणाले गोपालदास अग्रवाल हे विकासाचे व्हिजन असणारे दमदार नेतृत्त्व आहे.

Maharashtra Election 2019 ; Dangoli irrigation project will enrich farmers | Maharashtra Election 2019 ; डांर्गोली सिंचन प्रकल्पामुळे शेतकरी समृद्ध होणार

Maharashtra Election 2019 ; डांर्गोली सिंचन प्रकल्पामुळे शेतकरी समृद्ध होणार

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जब्बारटोला, पांढराबोडी येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. सिंचनाच्या अपुऱ्या साधनामुळे धानाला पर्याय पीक शेतकऱ्यांना घेता येत नव्हते. त्यामुळे बाघ नदीवर डांर्गोली जवळ बंधारा तयार करण्यात येणार आहे. यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.या प्रकल्पामुळे शेतकºयांना उसाची लागवड करणे शक्य होणार आहे.त्यामुळे उसावर प्रक्रिया करणारा साखर कारखाना सुध्दा लवकर सुरू यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील शेतकरी समृध्द होईल, असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे भाजप-सेना युतीचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
निवडणूक प्रचारार्थ गोंदिया विधानसभा क्षेत्रातील बाजपेयी चौक, गौतम नगर, माताटोली, कुंभारेनगर, बारहखोली, शंकर चौक येथे पदयात्रा व नवेगाव, जब्बारटोला, पांढराबोडी,लहीटोला, कन्हारटोला, लोहारा, गिरोला, पिपरटोला येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, प्रदीपसिंह परिहार,जिल्हा महामंत्री दीपक कदम, अमित अवस्थी, सुनील केलनका, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, चमनलाल बिसेन, रमेश अंबुले, प्रिया मेश्राम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात आपल्या माध्यमातून मागील पाच वर्षांत अनेक विकास कामे झाली. शिवाय नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी गोंदिया प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करुन विविध ३२ शासकीय कार्यालये एकत्र आणली. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत झाली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश झाल्याने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत झाली आहे. भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळे म्हणाले गोपालदास अग्रवाल हे विकासाचे व्हिजन असणारे दमदार नेतृत्त्व आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सुध्दा त्यांच्या विकास कामांची दखल घेतली आहे. शहरातील भूमिगत गटार योजनेसह अनेक विकास कामे त्यांच्याच पाठपुराव्यामुळे झाले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Dangoli irrigation project will enrich farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.