Maharashtra Election 2019 ; बॉयोटेक प्रकल्पातून रोजगाराच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 10:09 PM2019-10-15T22:09:20+5:302019-10-15T22:10:52+5:30
काँग्रेस पक्ष जे ७० वर्षात करु शकले नाही ते या सरकारने ५ वर्षात करुन दाखविले.सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले असून नाबार्डकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने ते पूर्ण होत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी व औद्योगिक विकासासाठी बॉयोटेक्नालॉजीवर आधारित नवीन प्रकल्प उभारण्याचे सरकारच्या विचाराधिन आहे. येणाऱ्या काळात याची महुर्तमेढ रोवली जाईल. वनसंपत्तीचा वापर करुन इंधन निर्मितीकरिता प्रकल्प राबविण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ आमगाव येथे मंगळवारी आयोजित प्रचारसभेला संबोंधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने खा. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ.केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष अॅड. येशूलाल उपराडे, परसराम फुंडे, प्रमोद संगीडवार, शोभेलाल कटरे, सुरेंद्र नायडू, अॅड.बागडे, रघुनाथ भूते, सुभाष आकरे, नरेंद्र वाजपेयी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, नवीन भारत देशाच्या उभारणीसाठी विकासाची नवी दृष्टी मोदी सरकारने दिली.
काँग्रेस पक्ष जे ७० वर्षात करु शकले नाही ते या सरकारने ५ वर्षात करुन दाखविले.सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले असून नाबार्डकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने ते पूर्ण होत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही.
सिंचनाअभावी नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु आता हे चित्र हळूहळू बदलत आहे. नदी जोड प्रकल्पामुळे सिंचनाचा प्रश्न सुटेल आणि वाहतूक देखील स्वस्त व सोयीची होईल.