Maharashtra Election 2019 ; जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच आपली शिदोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:21+5:30
निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे, नारायण हटवार, गुरुदेव चांदेवार, नमूदेव नागापुरे, सी.बी. टेंभुर्णे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : विरोधक मागील दहा वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटल्याचा आरोप करीत आहे. हे जर सत्य असते तर जनतेने आपल्याला दुसऱ्यांदा संधी दिली नसती. मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांना ते कधीच जवळ करीत नाही. मात्र आपण या मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला ही बाब जनतेला सुध्दा माहिती आहे. त्यामुळे मतदारसंघात गेल्यानंतर त्यांच्याकडून स्वागत आणि प्रेम मिळत आहे हीच त्याची खरी पावती आहे. आपल्यासाठी या मतदारसंघातील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच मोठी शिदोरी असल्याचे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी केले.
निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे, नारायण हटवार, गुरुदेव चांदेवार, नमूदेव नागापुरे, सी.बी. टेंभुर्णे उपस्थित होते. बडोले म्हणाले, राज्यात १५ वर्षे आघाडीचे सरकार असताना त्यांनी कोणती विकास कामे केली आणि आता ते पाच वर्षांत भाजप सरकारला त्यांच्या कामाचा हिशोब मागत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने पंधरा वर्षांत जर विकास कामे केली असती आणि शेतकऱ्यांसह सवसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावल्या असत्या तर जनतेने त्यांना नाकारले नसते.
आघाडी सरकारचे बोलायचेआणि करायचे एक असेच धोरण असल्याने जनतेने या दिशाभूल करणाऱ्यांचा खरा चेहरा ओळखून त्यांना सत्तेबाहेर ठेवण्याचे काम केले. भाजप सरकारने जर केवळ आश्वासने दिली असती आणि विकास कामे केली नसती तर जनता आमच्या पाठीशी उभी राहिली नसती.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडे विकासाचा रोडमॅप तयार असून त्याच मार्गावरुन सरकारची वाटचाल सुरू आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील सर्व समस्या मार्गी लागल्याचा दावा आपण कधी करणार नाही. मात्र मागील पाच वर्षांत अनेक विकास कामे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला.
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि धानाला ५०० रुपये बोनस देणे असो अथवा शेतकऱ्यांना कर्जमाफी, पेशंन देण्याचा मुद्दा असो या सर्व गोष्टी केवळ भाजप सरकारचा कार्यकाळात शक्य झाल्या हे कुणीही नाकारु शकणार नाही.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील मतदार हे जागृक असून ते ज्याच्यावर प्रेम करतात त्याला मनापासून साथ देतात. मागील दहा वर्षांत त्यांनी आपल्या प्रेमातून दाखवून दिले आहे. जनतेला विश्वासाला तडा जाईल असे कार्य आपण कधीच केले नाही भविष्यात सुध्दा करणार नाही. जे शक्य आहे तेच करुन दाखविण्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे यापुढेही या मतदारसंघातील जनता आपल्यासोबत राहिल असा आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे.