Maharashtra Election 2019 :विकासाला गती देण्यासाठी साथ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:52 AM2019-10-08T00:52:12+5:302019-10-08T00:52:57+5:30
विधानसभा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह सिंचनासह शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. हीच भूमिका भाजपची सुध्दा आहे. त्यामुळे विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे प्रतिपादन भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिन विकास हेच आपले सदैव स्वप्न राहिले आहे. या विधानसभा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह सिंचनासह शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. हीच भूमिका भाजपची सुध्दा आहे. त्यामुळे विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे प्रतिपादन भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोंदिया शहरातील सुर्याटोला, कुंभारेनगर येथे सोमवारी पदयात्रा तर अंभोरा, बरबसपुरा, टेमनी, चुलोद, खमारी, तांडा, अदासी येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, दीपक कदम, माजी जि.प.सदस्य अन्नाभाऊ बहेकार, प्रकाश डहाट, वाय.पी.रहांगडाले, चेतन रहांगडाले, गौरीशंक डहाट, प्रेम बिसेन, टेकचंद सिंहारे, राधेश्याम गजभिये, भास्कर रहांगडाले, रामसिंग परिहार, जिते रहेकवार, रोहीणी रहांगडाले उपस्थित होते. गोपालदास अग्रवाल म्हणाले, मागील पाच वर्षांच्या कालावधीत गोंदिया विधानसभा मतदारसंघात आपल्या माध्यमातून अनेक समस्या मार्गी लावण्यात आल्या. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी, सातबारा त्रृटी दूर करणे, उज्वला गॅस योजनेतंर्गत गॅस संच उपलब्ध करुन देण्यात आले. तर कामगारांना ५ हजार मानधन देण्याची योजना भाजप सरकारने सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अनेक चांगले निर्णय घेण्यात आले असून जगात भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील विकास कामांना अधिक गती देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या आशीर्वाद आणि सहकार्याची गरज असल्याचे सांगितले.
दीपक कदम म्हणाले काही लोक पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे सांगत सहानुभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जनतेने अशा भूलथापा बळी न पडू नये असे सांगितले.