Maharashtra Election 2019 ; दिग्गज उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दाखल केले नामाकंन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:00 AM2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:24+5:30

शुक्रवारी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून भाजपचे राजकुमार बडोले यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुर्गा चौक येथून रॅली काढून अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय कार्यालयात नामाकंन दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांनी माजी आ.राजेंद्र जैन, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थित प्रसन्ना लॉन येथून रॅली काढून नामाकंन दाखल केले.

Maharashtra Election 2019 ; Veteran candidates filed nominations on the last day | Maharashtra Election 2019 ; दिग्गज उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दाखल केले नामाकंन

Maharashtra Election 2019 ; दिग्गज उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दाखल केले नामाकंन

Next
ठळक मुद्देसर्वच दिग्गजांचे शक्ती प्रदर्शन : प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती, आता लक्ष ७ ऑक्टोबरकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा अखेरचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या जिल्ह्यातील दिग्गज उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करुन नामाकंन दाखल केले. या वेळी उमेदवारांसह त्या पक्षाचे वरिष्ठ नेते सुध्दा उपस्थित होते. शुक्रवार हा नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उपविभागीय कार्यालय परिसराला गर्दीचे स्वरुप आले होते.
शुक्रवारी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून भाजपचे राजकुमार बडोले यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुर्गा चौक येथून रॅली काढून अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय कार्यालयात नामाकंन दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांनी माजी आ.राजेंद्र जैन, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थित प्रसन्ना लॉन येथून रॅली काढून नामाकंन दाखल केले. गोंदिया मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप जिल्ह्याध्यक्ष हेमंत पटले,नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ. रमेश कुथे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, यांच्या उपस्थितीत सर्कस मैदान येथून रॅली काढून नामाकंन दाखल केले.तर काँग्रेसचे उमेदवार अमर वºहाडे यांनी शहीद काँग्रेस भोला भवन येथून रॅली काढून नामाकंन दाखल केले. तिरोडा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले यांनी मातोश्री लॉन येथून रॅली काढून नगराध्यक्ष सोनाली देशपांडे व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुड्डृू बोपचे यांनी तिरोडा येथील सभागृहात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थित सभा घेतली. त्यानंतर जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर,अजय गौर, प्रेम रहांगडाले यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला.आमगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सहषराम कोरोटे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांच्या उपस्थितीत धुकेश्वरी मंदिर परिसरातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
या उमेदवारांसह अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी नामाकंन दाखल केले.नामाकंन दाखल करण्यासाठी सर्व पक्षाच्या दिग्गज उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.त्यामुळे उपविभागीय कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते.

प्रचाराला येणार सोमवारपासून रंगत
विधानसभा निवडणुकीसाठी नामाकंन दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. तर सोमवारी नामाकंन वापस घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे सोमवारनंतरच जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यानंतरच निवडणूक प्रचाराला खरी रंगत येणार आहे.

सर्वच पक्षात बंडखोरी
यंदा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे उमेदवारी जाहीर करतांना शेवटच्या दिवसांपर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करित अपक्ष म्हणून नामाकंन दाखल केले.अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून काँग्रेसमधून बंडखोरी करित राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले,आनंद जांभुळकर यांनी तर भाजपमधून अपक्ष म्हणून पोमेश रामटेके यांनी नामाकंन दाखल केले.तर आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आ.रामरतन, नामदेव किरसान यांनी अपक्ष म्हणून शुक्रवारी नामाकंन दाखल केले.त्यामुळे सर्वच पक्षात बंडखोरी असल्याचे चित्र आहे.
खुशाल बोपचे यांचा पुत्रासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
विधानसभा निवडणुकीसाठी नामाकंन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी खा.खुशाल बोपचे आणि त्यांचे पुत्र गुड्डू बोपचे यांनी गुरूवारी रात्री उशीरा खा.प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसेने गुड्डू बोपचे यांना तिरोडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. दरम्यान खुशाल बोपचे यांचा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला प्रवेश भाजपला धक्का मानला जात आहे.
आता लक्ष बंडोबांना शांत करण्याकडे
सर्व पक्षाच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामाकंन दाखल केले आहे.त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते बंडोबाना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.त्यामुळे यात त्यांना कितपत यश येते हे ७ ऑक्टोबरलाच कळेलच. बंडोबा शांत न झाल्यास पक्षाला याचा फटका बसू शकतो.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Veteran candidates filed nominations on the last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.