Maharashtra Election 2019 : गावकरी विचारताहेत नेते, कार्यकर्त्यांना प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:46 AM2019-10-08T00:46:08+5:302019-10-08T00:46:30+5:30
विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील चावडी, हॉटेल आणि बसस्थानकातील कॉर्नरवर निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. देश विकासाच्या धोरणापासून ते ग्रामपातळीवरील विकास कामांचा उपहापोह या चर्चांमध्ये होत आहे. कोणता उमेदवार आपल्या गावाला न्याय देऊ शकेल, राष्टÑीय पातळीवर कोणाची सत्ता असायला हवी, सक्षम पंतप्रधान कोण असावा, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार, अशा अनेक मुद्यांवर चर्चा घडत आहेत. या चर्चामधूनच मतदानाचाही निर्णय होत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातही विविध चर्चांना उधाण आले. जो पक्ष अथवा उमेदवार गावच्या विकासाला न्याय देऊ शकतो, त्यांच्या पारड्यात मत टाकण्याचा विचार मतदार करीत आहेत. त्यामुळे केवळ स्वहिताचे राजकारण करणारे गाव पुढारी धास्तावले आहेत. गावातील व्होटबँक ढासळण्याची भीती या गावपुढाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील चावडी, हॉटेल आणि बसस्थानकातील कॉर्नरवर निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. देश विकासाच्या धोरणापासून ते ग्रामपातळीवरील विकास कामांचा उपहापोह या चर्चांमध्ये होत आहे. कोणता उमेदवार आपल्या गावाला न्याय देऊ शकेल, राष्टÑीय पातळीवर कोणाची सत्ता असायला हवी, सक्षम पंतप्रधान कोण असावा, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार, अशा अनेक मुद्यांवर चर्चा घडत आहेत. या चर्चामधूनच मतदानाचाही निर्णय होत आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे पुढारी कार्यरत आहेत. गावातील पुढारी आपल्याच पक्षाला मतदान कसे मिळले, याचे आखाडे बांधून पक्षाकडे वजन वापरत आहेत. आपल्या मागे गाव असल्याच्या बाता मारताना दिसत आहेत. गावातील पुढारी सर्वसामान्य जनतेला वेगवेगळी आमिषे दाखवून मतदान आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावात मिळणाºया मताधिक्यावरच गाव पुढाºयांचे वजन ठरते. मात्र सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मतदार हुशार झाले आहेत. चांगल्या आणि वाईटाचा विचार करु लागले आहेत. त्यामुळे गावपुढाºयांचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. परिणामी, गाव पुढाºयांनाही व्होट बँकेची चिंता लागली आहे. गावातील मतदान कमी जास्त झाले तर, नेत्यांसमोर आपले वजन कमी जास्त झाले तर नेत्यांसमोर आपले वजन कमी होईल, अशी भीती त्यांना सातत्याने लागली आहे. मतदानाचा दिवस जवळ येईपर्यंत गावखेड्यात अनेक घडामोडी होणार आहेत.
नेत्यांकडून नमस्कार, चमत्कार
जिल्हा परिषद, पंचायत समितीतील बहुतांश लोकप्रतिनिधी शहरी भागात वास्तव्याला आहेत. निवडणुका आल्यानंतर हे पुढारी गावात जावून लुडबूड करतात. गावातील मताधिक्य गाव पुढाºयांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत असल्याने ही व्होट बँक टिकविण्यासाठी त्यांनी धडपड सुरु केली आहे. आर्थिक झळ सोसूनही पुढारी मतदारांना खुश करीत असल्याची चर्चा आहे. नमस्कार-चमत्कार करुन स्वत:कडे लक्ष वेधत आहेत.