Maharashtra Election 2019 ; क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:27+5:30
युवांना शिक्षण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी विविध योजना, वाहतुकीसाठी रस्त्यांचे बांधकाम केले असून प्रत्येक वर्गाला विकासाच्या मुख्य धारेत जोडण्याचे प्रयत्न केल्याचे सांगीतले. क्षेत्रातील जनतेने जाती-धर्माच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाला प्राथमिकता दिली. आता यापुढेही विकासाला प्राथमिकता देत जनता आपला निर्णय घेणार असे मत व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्ष- शिवसेना- रिपाईचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी रविवारी (दि.६) विधानसभा क्षेत्रातील ग्राम दतोरा, गुदमा, मोरवाही, इर्री, नवरगाव खुर्द, नवरगावकला, कामठा, पांजरा, लंबाटोला, झिलमिली, छिपीया, चिरामनटोला, परसवाडा येथे सभा घेऊन संबोधित केले.
याप्रसंगी मजूर संघाचे उपाध्यक्ष दीपक कदम यांनी, गोपालदास अग्रवाल यांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन नेहमीच आपल्या क्षेत्राच्या विकासाला प्राथमिकता दिली. परिणामी टेमनी-मोरवाही-तांडा उपसा सिंचन योजना मंजूर झाली व त्यामुळे आसोली परिसरातील पूर्ण क्षेत्र सिंचीत होणार आहे. पुढेही विकासासाठी जनतेने योग्य निर्मण घेण्याची गरज असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेतराम कटरे यांनी, क्षेत्राच्या विकासाला गती देऊन अग्रवाल यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जी त्यांना राजकारणा पलीकडे जाऊन थेट मतदारांशी जोडते असे मत व्यक्त केले. अग्रवाल यांनी, क्षेत्राचा विकास हात आपला मूलमंत्र आहे. युवांना शिक्षण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी विविध योजना, वाहतुकीसाठी रस्त्यांचे बांधकाम केले असून प्रत्येक वर्गाला विकासाच्या मुख्य धारेत जोडण्याचे प्रयत्न केल्याचे सांगीतले. क्षेत्रातील जनतेने जाती-धर्माच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाला प्राथमिकता दिली. आता यापुढेही विकासाला प्राथमिकता देत जनता आपला निर्णय घेणार असे मत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, सूरजलाल महारवाडे, बंटी भेलावे, हरिचंद कावळे, मदन पटले, दिनदयाल गायधने, राजेश चतुर, पुरूषोत्तम राऊत, राजू कटरे, ओमेश चौैधरी, कैलाश पटले यांच्यासोबत मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.