महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ४ सप्टेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:05+5:302021-08-27T04:32:05+5:30

गोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० येत्या ४ सप्टेंबरला जिल्ह्यातील एकूण अकरा ...

Maharashtra Public Service Commission examination on September 4 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ४ सप्टेंबरला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ४ सप्टेंबरला

googlenewsNext

गोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० येत्या ४ सप्टेंबरला जिल्ह्यातील एकूण अकरा उपकेंद्रांवर एका सत्रात सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे.

गोंदिया येथील एस.एस. गर्ल्स कॉलेज विठ्ठलनगर, एस. एस. अग्रवाल म्युन्सिपल गर्ल्स हायस्कूल विठ्ठलनगर, मनोहर मुन्सिपल हायर सेकंडरी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज इंदिरा गांधी स्टेडियमजवळ, धोटे बंधू सायन्स कॉलेज कुडवा रोड रामनगर, सेंट झेवियर्स हायस्कूल विजयनगर बालाघाट रोड, बी. एन. आदर्श सिंधी विद्यामंदिर हायस्कूल मुर्री रोड, गुजराती नॅशनल हायस्कूल रेलटोली, साकेत पब्लिक स्कूल बजाजनगर फुलचूर रोड, विवेक मंदिर स्कूल हरिओम कॉलनी छोटा गोंदिया, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल रेलटोली, राजस्थान कन्या विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् कृष्णपुरा वाॅर्ड मोटवाणी चेंबरजवळ या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

................

परीक्षा केंद्र परिसरासाठी सूचना

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरीत्या प्रवेश करणार नाहीत व कोणत्याही प्रकारची घोषणा देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरातील झेरॉक्स, फॅक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, पेजर व ध्वनिक्षेपक आदी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल, लॅपटॉप, काम्प्युटर व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल.

.............

१४४ मनाई आदेश लागू

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ची कलम १४४ चे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. आदेश ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी जयराम देशपांडे यांनी कळविले आहे.

Web Title: Maharashtra Public Service Commission examination on September 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.