Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!

By अंकुश गुंडावार | Published: November 25, 2024 02:51 PM2024-11-25T14:51:19+5:302024-11-25T14:54:21+5:30

महायुतीने यावेळी या दोन्ही जिल्ह्यांतील उमेदवारांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी ही खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली होती.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Praful Patel prevails over many constituencies! | Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!

Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!

अंकुश गुंडावार, गोंदिया 
Maharashtra Elections 2024: गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हेवीवेट नेते खासदार प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याभोवती केंद्रित राहिले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्धमहायुती अशी लढत झाली असली, तरी खरी प्रतिष्ठा ही पटेल आणि पटोले यांची पणाला लागली होती. दोन्ही वजनदार नेते असल्याने त्यांचे गृहजिल्हे असल्याने या दोन्ही जिल्ह्यांत नेमकी कोण बाजी मारतो, याकडे राज्य व देशाचे लक्ष लागले होते. महायुतीने दोन्ही जिल्ह्यांत ७ पैकी ६ जागा जिंकल्याने वर्चस्वाच्या लढाईत पटोलेंवर पटेलच वरचढ ठरले.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत महायुतीचे उमेदवार ठरविण्यात खा. प्रफुल्ल पटेल, तर महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यातच या दोन्ही नेत्यांमधील शीतयुद्ध सर्वांनाच परिचित आहे. 

महायुतीने यावेळी या दोन्ही जिल्ह्यांतील उमेदवारांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी ही खा. पटेल यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे त्यांनी प्रचारादरम्यान तब्बल आठ दिवस या दोन्ही मतदारसंघांत तळ ठोकून मोर्चेबांधणी केली निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांत कुठलेही मतभेद निर्माण होऊन त्याचा उमेदवाराला झटका बसू नये, याची काळजी घेतली. 

प्रचारादरम्यान विरोधकांवर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा महायुती सरकार काय करणार, यावर भर दिला निवडणुकीदरम्यान त्यांनी सूक्ष्म नियोजन केले. यामुळेच प्रथमच महायुतीचे ७ पैकी १ उमेदवार निवडून आले.

पटोले करतील का आत्मपरीक्षण? 

दोन्ही जिल्ह्यांत उमेदवारी देताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. तसेच पक्षाला याचा फटका बसेल, असा इशारादेखील दिला होता, पण यानंतरही पटोलेंनी याची दखल घेतली नाही. परिणामी, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पटोले आता या सर्व गोष्टींचे आत्मपरीक्षण करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Praful Patel prevails over many constituencies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.