महाविकास आघाडी सरकार कोरोना उपाययोजनात अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:47+5:302021-06-17T04:20:47+5:30
देवरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील अनेकांना जीव गमावले लागले. कोविडच्या सुरुवातीच्या काळात महाविकास ...
देवरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील अनेकांना जीव गमावले लागले. कोविडच्या सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे दुसऱ्या लाटेत लोकांना जीव गमवावे लागले, असा आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटप कार्यक्रमाप्रसंंगी ते बोलत होते. फुके म्हणाले की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोविडच्या काळात रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. महाविकस आघाडी सरकारला पूर्व तयारी करण्याचा सूचना दिल्या होत्या. परंतु कोविडच्या दुसऱ्या लाटेबद्दल हे सरकार अनभिज्ञ होऊन लोकांना वाऱ्यावर सोडून दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवणाऱ्या मशीनचे वितरण करीत आहेत. जेणेकरून भविष्यात गरजू रुग्णांची सेवा करता येईल, असे सांगितले. यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, भाजप जिल्हा अध्यक्ष केशव मानकर, माजी आ. संजय पुराम, माजी आ. भेरसिंग नागपुरे यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बाळा अंजनकर, जिल्हा संघटन मंत्री संजीव कुलकर्णी, तालुका अध्यक्ष अनिल येळणे, महामंत्री लायकराम भेंडारकर, रघुनाथ लांजेवार, नामदेव कापगते, उमाकांत ढेंगे, शिवनारायण पालीवाल, केवलराम पुस्तोडे, प्रकाश गहाणे, रामदास कोहटकर, विजय कापगते, देवेंद्र टेंभरे, विलास बागडकर, हर्ष मोदी, चेतन वडगाये, सी.सी. येडे, अरविंद शिवणकर, गुणवंत बिसेन, काशीराम हुकरे, साहेबलाल कटरे, झामसिंग येरणे, श्रीकृष्ण हुकरे, कौशल्या कुंभरे, राजकुमार रहांगडाले, राजू चांदेवार, छेदीलाल साहू, शंकर मडावी, बाबा लिल्हारे, बडोले, बद्री प्रसाद दसरिया, ॲड. ऊपराडे, हनवंत वट्टी उपस्थित होते.