अहिंसा मॅराथॉन स्पर्धेत महेश व वैशाली प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:50 AM2018-10-03T00:50:11+5:302018-10-03T00:51:13+5:30
जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित अहिंसा मॅराथॉन स्पर्धेत ७ हजार ६२० स्पर्धक धावले. ४२.१९५ किमी या फूल मॅराथॉनमध्ये गडचिरोलीचा महेश रामलू वाढई याने २ तास ३४ मिनिटात मॅराथॉन पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित अहिंसा मॅराथॉन स्पर्धेत ७ हजार ६२० स्पर्धक धावले. ४२.१९५ किमी या फूल मॅराथॉनमध्ये गडचिरोलीचा महेश रामलू वाढई याने २ तास ३४ मिनिटात मॅराथॉन पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला. तर मुलींच्या गटात वैशाली सुनील मते हिने ४ तास ३५ मिनीट १५ सेकंदात पूर्ण मॅराथॉन करून प्रथम क्रमांक पटकाविले.
या स्पर्धेत ७६२० स्पर्धक धावले यात २ हजार १५० महिलांचा सहभाग होता. कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरून आमगाव किडंगीपार रेल्वे क्रासिंगपर्यंत ही स्पर्धा घेण्यात आली. ४२.१९५ किमी मॅरेथॉन स्पर्धा सकाळी ५.३० वाजता सुरू झाली.
अर्ध मॅराथॉनमध्ये २१.१९७ किमी सकाळी ६ वाजता सुरू झाली. ६ किमी मॅराथॉन स्पर्धा सकाळी ८ वाजता सुरू झाली. या दरम्यान आवश्यक सेवा वगळता इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित मॅराथॉन स्पर्धेत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही हे विशेष पोलिस विभागाच्या अत्यंत उत्कृष्ट नियोजनामुळे ही मॅरेथान स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेत महिला व पुरूषांना वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले. या मॅराथॉन स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणून धावक मुन्नालाल यादव हे गांधीजींच्या वेषात धावले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. परिणय फुके, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली क्षेत्र अंकुश शिंदे, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, आंतरराष्ट्रीय मॅराथॉन धावपटू मोनिका आथरे, जि.प.चे मुकाअ डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिष बैजल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, धावक मुन्नालाल यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप आवळे, गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व इतर अधिकारी उपस्थित होते. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या छायाचित्राचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
पूर्ण मॅराथॉन ४ तास ३८ मिनिटात पूर्ण करणाºयांना मुंबई येथे होणाºया राष्ट्रीय मॅराथॉनमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षीका मंजूश्री देशपांडे तर आभार गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले.
६ किमी. मॅराथॉन स्पर्धेतील महिला विजेता
प्रथम-वैशाली रहांगडाले (२० मिनिटे ५२ सेकंद), द्वितीय- सुषमा रहांगडाले (२६ मिनिटे ५५ सेकंद), तृतीय- पदमा पाचे (२७ मिनिटे ५१ सेकंद), चतुर्थ- तनूजा वाढवे (२८ मिनिटे २३ सेकंद), पाचवा- हसिता वाळवे (२९ मिनिटे ०५ सेकंद), सहावा- आशा शहारे (२९ मिनिटे ३९ सेकंद), सातवा- गायत्री मौजे (३० मिनिटे १२ सेकंद), आठवा- सत्यवती मच्छीरके (३० मिनिटे ४१ सेकंद), नऊवा- सत्यशीला दसरीया (३० मिनिटे ४४ सेकंद), दहावा- रियाली राऊत (३० मिनिटे ४६ सेकंद)
४२.१९५ किमी मॅराथॉनमधील विजेते
प्रथम- महेश रामलू वाढई, द्वितीय- सुभाष दिनाजी लिल्हारे, तृतीय- दिनेश दाऊदसरे, चतुर्थ- राहूल हुकूमचंद मेश्राम, पाचवा- महेंद्र कचलाम, सहावा- सावंत साखरे, सातवा- आकाश बाबुलाल मोहुर्ले, आठवा- शेख उनयलींग मुरोर्य, नऊवा- अरूण धनलाल थिवकर, दहावा- मनोज मुरारी कचलाम.
४२.१९५ किमी मॅराथॉन महिलांची बाजी
वैशाली सुनील मते यांनी ४ तास ३५ मिनीट १५ सेंकदात मॅरेथान पूर्ण करून प्रथम आली. उषा सुखराम वलथरे ४ तास ३९ मिनिट ३० सेंकदात द्वितीय तर सविता मोहन लिल्हारे यांनी ४ तास ४४ मिनीटे ३९ सेकंदात मॅरेथान पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकाविला.
६ किमी. मॅराथॉन स्पर्धेतील विजेते
प्रथम-सौरभ धनवंत बघेले (२० मिनिटे ९ सेकंद), द्वितीय- राजेश पुरूषोत्तम चौधरी (२० मिनिटे ५० सेकंद), तृतीय- विशाल धुरनलाल लिल्हारे (२१ मिनिटे १० सेकंद), चतुर्थ- विकास भोजराज बावणकर (२१ मिनिटे ४७ सेकंद), पाचवा- करण संतोष खरे (२१ मिनिटे ५० सेकंद), सहावा- राजेंद्र संदीप गोत्रे (२१ मिनिटे ५३ सेकंद), सातवा- महेंद्र मुरकुटे (२१ मिनिटे ५८ सेकंद), आठवा- संदीप पारधी (२२ मिनिटे ०४ सेकंद), नऊवा- अंकुश कोहराम (२२ मिनिटे १० सेकंद), दहावा- लोकचंद गहगये (२२ मिनिटे ११ सेकंद)