जिल्हा परिषदेवर ‘महिलाराज’

By admin | Published: January 20, 2015 12:06 AM2015-01-20T00:06:38+5:302015-01-20T00:06:38+5:30

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ५३ सदस्यांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात ५० टक्के आरक्षणानुसार २७ मतदार

'Mahilaraj' on Zilla Parishad | जिल्हा परिषदेवर ‘महिलाराज’

जिल्हा परिषदेवर ‘महिलाराज’

Next

५० टक्के महिला : दिग्गजांना धक्का, अनेकांचे मतदारसंघ आरक्षित
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ५३ सदस्यांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात ५० टक्के आरक्षणानुसार २७ मतदार संघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत महिला सदस्य राहणार असल्यामुळे जिल्हा परिषदेवर ‘महिलाराज’ येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका अवघ्या ६ महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या ११ जुलैला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामी लागली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ५३ मतदार संघांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रत्येक सोडतीसाठी एका बरणीत संबंधित जि.प.मतदार संघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील एक चिठ्ठी बालकाच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी व जिल्हाभरातून आलेले इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने हजर होते.
यापूर्वी जिल्हा परिषदेत महिलांची संख्या ३३ टक्के होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेवर ५० टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच २७ महिला सदस्य दिसणार आहेत. या आरक्षणामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांसह अनेक दिग्गज उमेदवारांना आपला मतदार संघ सोडून जवळच्या दुसऱ्या मतदार संघात आसरा घ्यावा लागणार आहे. तर काही जणांना स्वत: बाजुला राहून आपल्या सौभाग्यवतीला सामोरे करावे लागणार आहे.
दिग्गजांसह ३९ सदस्यांच्या
मतदार संघांवर गंडांतर
सोमवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत विद्यमान ५२ सदस्यांपैकी ३९ सदस्यांना नवीन आरक्षणानुसार यावेळी पुन्हा आपल्या मतदार संघातून निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे त्यांना जवळच्या दुसऱ्या मतदार संघात आश्रय घ्यावा लागणार आहे. ज्यांच्या मतदार संघांवर गंडांतर आले त्या दिग्गजांमध्ये विद्यमान जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, विद्यमान सभापती मोरेश्वर कटरे, सविता पुराम, प्रकाश गहाणे, कुसन घासले, याशिवाय नरेंद्र तुरकर, श्रावण राणा, पंचम बिसेन, विष्णू बिंझाडे, किरण गावराने, रुपाली टेंभुर्णे, मिलन राऊत, राजेश चांदेवार, संदीप भाटीया, अरविंद शिवणकर, उमाकांत ढेंगे, किरण कांबळे आदींचा समावेश आहे. त्यांना इतर कुठल्या मतदार संघातून निवडणूक लढवावी लागेल.

Web Title: 'Mahilaraj' on Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.