गावागावांत शांती व सलोखा कायम ठेवा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:27 AM2021-09-13T04:27:21+5:302021-09-13T04:27:21+5:30
बोंडगावदेवी : पोलीस पाटील शासनाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. गावामध्ये सर्व जाती धर्मामध्ये शांती व सलोखा सदोदित कायम ठेवण्यासाठी ...
बोंडगावदेवी : पोलीस पाटील शासनाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. गावामध्ये सर्व जाती धर्मामध्ये शांती व सलोखा सदोदित कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका गावचे पोलीस पाटीलच बजावू शकतात. आजघडीला सण व सार्वजनिक उत्सव, मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहे. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून कुठेही अप्रिय तेढ निर्माण होणार नाही यासाठी गावपातळीवरील पोलीस पाटलांनी सतर्क राहून पोलीस विभागाला इत्थंभूत माहिती देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी केले.
पोलीस पाटील संघटनेच्यावतीने आयोजित परिचय व सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मधुकर पर्वते, उपाध्यक्ष डाकराम मेंढे, सचिव राष्ट्रपाल भोवते, कार्याध्यक्ष नेमीचंद मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी संघटनेच्यावतीने जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रपाल भोवते यांनी सूत्रसंचालन केले. नेमीचंद मेश्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जयप्रकाश लाडे, विरेन सरकार, रमेश झोळे, संतोष डोंगरवार, मंगला रामटेके, सुनंदा शिवणकर, हेमा खोब्रागडे, टिकाराम बन्सोड यांच्यासह अन्य पोलीस पाटील उपस्थित होते.