थकीत पाणी शुल्काने मजीप्राची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:45 PM2019-02-21T22:45:35+5:302019-02-21T22:47:50+5:30

गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाचीे आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचे आहे. ग्राहकांकडील थकीत पाणी शुल्काच्या रक्कमेत दरवर्षी १ कोटी रुपयांची भर पडत आहे.

Majeed's financial closure due to water tired water | थकीत पाणी शुल्काने मजीप्राची आर्थिक कोंडी

थकीत पाणी शुल्काने मजीप्राची आर्थिक कोंडी

Next
ठळक मुद्देथकीत रकमेत दरवर्षी १ कोटीची भर : १३ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाचीे आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचे आहे. ग्राहकांकडील थकीत पाणी शुल्काच्या रक्कमेत दरवर्षी १ कोटी रुपयांची भर पडत आहे. परिणामी मजीप्राची आर्थिक कोंडी झाली असून अशीच स्थिती राहिल्यास पाणी पुरवठा योजना संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यातील डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून गोंदिया शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मजीप्रातर्फे केला जातो. शहरात मजीप्राचे एकूण १४ हजार ८५० ग्राहक आहेत. या ग्राहकांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र ग्राहक नियमित पाणी शुल्काचा भरणा करीत नसल्याने थकबाकीच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे.त्यामुळेच शहरातील ग्राहकांवर थकीत पाणी शुल्कापोटी १३ कोटी ५४ लाख ८१ हजार १८४ रुपये थकीत आहेत.
डिसेंबर २०१८ पर्यंत ज्या ग्राहकांकडे पाणी शुल्क थकीत होते त्यात घरगुती ग्राहकांकडे ११ कोटी ९५ लाख ८४ हजार ६४० रुपये, औद्योगिक ग्राहकांकडे ९८ लाख ६० हजार ९६ रुपये, सार्वजनिक ग्राहकांकडे ५४ लाख ६७ हजार ५७० रुपये व नगर परिषदेकडे ५ लाख ६६ हजार ७७० रुपये थकीत होते. यापैकी जानेवारी २०१९ मध्ये ४ लाख १४ रुपये ग्राहकांनी भरले.
थकीत पाणी शुल्काच्या आकड्यात दरवर्षी वाढ होत असल्याने मजीप्राची आर्थिक कोंडी होत आहे.

ग्राहकांच्या संख्येत वाढ
मागील दोन वर्षांपूर्वी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शंभर कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. ही योजना कार्यान्वित होण्यापूर्वी मजीप्राचे १३५०० ग्राहक होते. नवीन योजनेनंतर यात १ हजार ग्राहकांची भर पडली असून एकूण ग्राहकांची संख्या १४ हजार ८५० ऐवढी झाली आहे. यात घरगुती ग्राहकांची संख्या १४ हजार ६३१, व्यावसायीक ७४, इतर १०३ व नगर परिषदेचे ४२ स्टॅन्डपोस्ट आहेत.

व्याजच साडेचार कोटीचे
मजीप्राचे पाणी शुल्काची ९ कोटी १९ लाख ४४ हजार ६३४ रुपये ग्राहकांकडे थकीत आहे. मात्र या थकबाकीच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्याने त्यावरील व्याज वाढत आहे. त्यामुळेच या थकीत रक्कमेवर ४ कोटी ३५ लाख ३६ हजार ४४३ रुपयांचे निव्वळ व्याज आहे. थकीत पाणी शुल्काच्या वसुलीसाठी मजीप्राने अभियान सुध्दा राबविले मात्र त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.

Web Title: Majeed's financial closure due to water tired water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी