शेतकऱ्यांना बारदाणा उपलब्ध करुन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:31 PM2018-11-29T22:31:56+5:302018-11-29T22:32:38+5:30
आदिवासी विकास महामंडळाचे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटत आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकºयांना बाहेरुन अतिरिक्त दराने बारदाणा खरेदी करुन धान विक्री करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : आदिवासी विकास महामंडळाचे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटत आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकºयांना बाहेरुन अतिरिक्त दराने बारदाणा खरेदी करुन धान विक्री करावी लागत आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटांना तोंड देत असलेल्या शेतकºयांना शासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या सर्वच शासकीय धान खरेदी केंद्रावर त्वरीत बारदाणा उपलब्ध करुन देण्यात यावा.अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका युवक काँग्रेसने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शासनाच्या वतीने मोठा गाजावाजा करुन आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. परंतु या धान खरेदी केंद्रावर बारदाणाच उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांना धानाची विक्री करण्यासाठी गरजेपोटी १५ रुपयांचा बारदाणा २५ रुपयांना खरेदी करावा लागत आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावरील बारदाण्याचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी दिलेल्या निवेदनातून दिला.
शिष्टमंडळात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत राऊत, जिल्हा महासचिव अमित राऊत, बांधकाम सभापती रेहान शेख, महेश सोनवाने, विकास डोंगरे, संदीप शहारे, संतोष भंडारी, प्रशांत वैद्य, निकेश उके, नूतन बारसागडे, महेंद्र वंजारी, सुशील बडोले, विस्मय बडोले, सतिश कटरे, संतो भंडारी, कैलास उईके, लोकेश वंजारी, सिद्धार्थ राऊत, शरद नागपुरे, प्रज्वल लांजेवार, राजा पठाण, भरत मेंढे व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.