जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:20 AM2017-08-19T01:20:48+5:302017-08-19T01:21:06+5:30

बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले.

 Make the district declare drought | जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

Next
ठळक मुद्देशेतीचे पंचनामे तत्काळ करा : जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले.
हवामान विभागाच्या सूचनेप्रमाणे शेतकºयांनी भातपिकाच्या पेरणीला ७ जूनपासून सुरूवात केली होती. परंतु पाऊस न आल्यामुळे शेतकºयांनी पुन्हा ३० जूनपासून दुबार पेरणी केली. पण गोंदिया जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे भातपिकाची रोवणी केवळ १५ टक्केच झाली.
रोवणी करण्याची शेवटची तारिख १५ आॅगस्ट असते. त्यानंतर रोवणी केली तर धानपीक अत्यल्प प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.
धानाचे पीक पूर्णत: करपले असून आता धानपिकाची रोवणी करता येणार नाही. पालकमंत्री बडोले यांनी १५ आॅगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर जिल्ह्यात दुष्काळ घोषित करू, अशी घोषणा केली होती. परंतु या संदर्भात आतापर्यंत शासनाने काहीही घोषणा केली नाही.
पाऊस अत्यल्प पडल्यामुळे शेती व पिण्यासाठी पाण्याची मोठी टंचाई आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा अन्यथा सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघातर्फे देण्यात आला आहे.
निवेदन देताना संघाचे अध्यक्ष संजयसिंह टेंभरे, चुटियाचे सरपंच चंद्रकला तुरकर, उपसरपंच रामू शरणागत, माजी सरपंच रतनलाल बघेले, कुंडलीक तुरकर, डोमाजी टेंभरे, दुलीचंद कटरे, कुवरलाल शरणागत, मुन्नालाल तुरकर, दुर्गाप्रसाद कुरंजेकर, समलीक तुरकर, धनलाल गौतम, अशोक टेंभरे, जीवनलाल पटले, देवनाथ येलसरे, मुन्नालाल गौतम, हरिलाल गराकाटे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकºयांच्या मागण्या
गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती द्या, शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई द्या, जनावरांच्या चाºयाची छावणी ग्रामपंचायत पातळीवर सुरू करा, शेतकºयांचे कृषी पंपाचे विद्युत बिल पूर्ण माफ करा, शेतकºयांना नवीन कर्जाची व्यवस्था करून द्या, गावांमध्ये पिण्याचे पाणी कमी झाल्यामुळे े टँकर सुरू करा, रोहयोच्या कामांना तत्काळ मंजूर करून कामे सुरू करा, शेतमजुरांचे पलायन थांबविण्यासाठी त्यांना तात्काळ कामे द्या, ज्या बंद व अपूर्ण पाणी पुरवठा योजना आहेत त्यांना तत्काळ सुरू करा.
 

Web Title:  Make the district declare drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.