पिण्याच्या पाण्याची सोय करा

By admin | Published: March 30, 2017 01:14 AM2017-03-30T01:14:36+5:302017-03-30T01:14:36+5:30

बोअरवेलमध्ये मोटारपंप बसवून पाणी टंकीमध्ये टाकले जात असल्याने शास्त्री वॉर्डातील अन्य बोअरवेल व विहीरी आटत आहेत.

Make Drinking Water Facility | पिण्याच्या पाण्याची सोय करा

पिण्याच्या पाण्याची सोय करा

Next

भटकंती : धरणे आंदोलनाचा गावकऱ्यांचा इशारा
सौंदड : बोअरवेलमध्ये मोटारपंप बसवून पाणी टंकीमध्ये टाकले जात असल्याने शास्त्री वॉर्डातील अन्य बोअरवेल व विहीरी आटत आहेत. यामुळे शास्त्री वॉर्डवासीयांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने वॉर्डात पाण्याची सोय करावी अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप ठोकून तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा वॉर्डवासीयांनी दिला आहे.
सविस्तर असे की, शास्त्री वार्डमध्ये महात्मा ज्योतिबा फुले भवनासमोर असलेली बोअरवेल वॉर्डातील जनतेला उन्हाळ्यामध्ये जीवनदायीनी ठरते. मात्र ग्रामपंचायत या बोअरवेलमध्ये ३ एच.पी. मोटरपंप लावून यातील पाणी टंकीत भरत आहे. परिणामी परिसरातील विहिरी व बोअरवेल कोरड्या पडत आहेत. हा प्रकार गेल्या दोन वर्षापासून चालू आहे. त्यामुळे शास्त्री वॉर्डातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
२६ मार्च रोजी या बोअरवेलवर आलेल्या कर्मचाऱ्यांना वॉर्डातील जनतेने हाकलून लावले. ग्रामपंचायतला १४ व्या वित्त आयोगात मिळालेला निधी पाणी पुरवठा व विजबीलकरिता खर्च केला जातो. तरिही सदर ग्रामपंचायत वर चार लाख रूपयांचे वीज बिल थकीत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याचे दिसते. यामुळेच पाणी पुरवठ्याचे अनेक साधन असूनही गावातील जनतेला पाणी पुरवठा वारंवार खंडीत केला जातो. अशात महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता रोजच शेत गाठावे लागते. ग्रामपंचायतने पाणी बिल न भरल्यास दाखले मिळणार नाही. असे फर्मान काढले आहे. मात्र तीन महिनेही पाणी पुरवठा होत नसल्याने पाणी बिल कशाला भरायचे असाही प्रश्न जनता करीत आहे. मात्र एकाच्या खाद्यावर दुसऱ्याची बंदूक असल्याचे दिसते. ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Make Drinking Water Facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.