भविष्यातील शिवाजी घडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:40 PM2019-02-24T22:40:13+5:302019-02-24T22:41:14+5:30
विद्यार्थ्यांच्या भविष्यात देशाचे स्वप्न साकारताना पालकांना कष्ट उपसावे लागतात. यासाठी काळजावर दगड ठेवण्याचे धाडस करावे लागते. स्वत:च्या मुलाचे भविष्य घडविताना आजच्या मातांनी याचे अनुकरण करून मुलाच्या भविष्यात देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बालपणापासूनच बाळकडू द्यावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : विद्यार्थ्यांच्या भविष्यात देशाचे स्वप्न साकारताना पालकांना कष्ट उपसावे लागतात. यासाठी काळजावर दगड ठेवण्याचे धाडस करावे लागते. स्वत:च्या मुलाचे भविष्य घडविताना आजच्या मातांनी याचे अनुकरण करून मुलाच्या भविष्यात देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बालपणापासूनच बाळकडू द्यावे. लोककल्याणकारी जाणता राजा घडविण्यासाठी पोटच्या लेकरासोबत समाजातील लेकरांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केल्यास भविष्यात घराघरात शिवाजी घडतील,असे प्रतिपादन शिक्षक केदार नाकाडे यांनी केले.
बाप युथ आॅर्गनायझेशन शेंडातर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहीदास यांच्या जयंती कार्यक्रम शनिवारी येथील जि.प.शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता.
या वेळी ते बोलत होते. उद्घाटन पं.स.सदस्य गीता टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच मोहनलाल बोरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते कृपासागर जनबंधू, चंद्रमुनी बन्सोड, लालचंद गजभिये, राजू मेश्राम, खुशाल शहारे, दिलीप बन्सोड, गौतम तिरपुडे, शिक्षक वैद्य,जनबंधू, राऊत, मानवटकर व वंजारी हे होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहीदास यांच्या तैलचित्राच्या पूजनाने झाली.
या कार्यक्रमाप्रसंगी पुलवामा येथे शहीद सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली.नाकाडे म्हणाले, बहुजनाप्रती पालक आदर्श राजा शिव छत्रपतींना घडविण्यात मोलाची कामगिरी राष्ट्रमाता जीजाऊंनी केली.अंधश्रद्धेला मुठमाती देवून अत्यंत कठीण परिस्थितीत जिजाऊने बालपणापासूनच स्वत: लक्ष देऊन शिवरायांना घडविले.त्यांचा आदर्श विज्ञान युगातील स्त्रियांनी घेण्याची गरज आहे. महाराजांनी धर्माचे राजकारण कधीच केले नाही. महाराजांच्या नेतृत्वात लढणारे मावळ्यात सर्व जाती धर्माचे योद्धे होते. त्यांचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी गावातील तिन्ही शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन संदीप मेश्राम यांनी केले तर आभार भुमेश तागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोहीत राऊत, चेतन खोब्रागडे, महेंद्र शहारे, शिवम साखरे, आशिष मेश्राम,रुपेश मेश्राम, भागवत मेश्राम, सुदर्शन मेश्राम, विवेक वैद्य, दिनेश राऊत, तांडेकर, धिरज शहारे, लिप्कांत बोरकर व वैभव मेश्राम यांनी सहकार्य केले.