जीवनाचे ध्येय निश्चित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:16 PM2019-01-24T22:16:17+5:302019-01-24T22:17:18+5:30
कुणबी समाजातील युवकांनी शिवरायांचे मावळे होवून जीवनाचे ध्येय निश्चित करून कार्य करतांना युध्दात जात आहे असे नाही, युध्द जिंकण्यासाठी जात आहे असे ठरवून कार्य करावे. तसेच विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेकडे मार्गक्रम करावे असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक प्रा.दिपक बहेकार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : कुणबी समाजातील युवकांनी शिवरायांचे मावळे होवून जीवनाचे ध्येय निश्चित करून कार्य करतांना युध्दात जात आहे असे नाही, युध्द जिंकण्यासाठी जात आहे असे ठरवून कार्य करावे. तसेच विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेकडे मार्गक्रम करावे असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक प्रा.दिपक बहेकार यांनी केले.
कुणबी समाज सांस्कृतिक प्रबंधन समितीच्यावतीने संत तुकाराम महाराज कुणबी समाज भवनात रविवारी (दि.२०) आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय शिवणकर होते. तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रबोधनकार मुख्याध्यापिका सुनिता ब्राम्हणकर, सभापती सुनंदा बहेकार, श्रावण कटरे तर पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सुखराम फुंडे, अॅड. सेवकराम बागडे, प्रबंधन सेवा समितीचे प्रा.सी.जी.पाऊलझगडे, से.शिक्षक काशिराम शिवणकर, प्रितम गायधने, जि.प.माजी अध्यक्ष उषा मेंढे, ओमप्रकाश मटाले, संगीता दोनोडे, लक्ष्मण चुटे, पं.स.सदस्य सिंधू भुते, लिलाधर बहेकार, दिगंबर करोे, कृष्णा कोरे, सांस्कृतिक समितीचे सचिव शरद फुंडे, विवाह समितीचे शालीक येटरे, महिला समिती अध्यक्ष लिला कठाणे, सचिव योगीता कठाणे उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत सामाजिक क्रांतीचे प्रणेतेचे पुस्तक भेट देवून करण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्याचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. समाजातील पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाचे नियोजन करावे जेणेकरुन भविष्यात मनस्ताप होणार नाही असे सुनंदा बहेकार यांनी सांगीतले. याप्रसंगी बहुउद्देशिय हायस्कूल अर्जुनी-मोरगावच्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या भूमिका साकारुन प्रबोधन केले. या चमूचा अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित सुनिता ब्राम्हणकर यांच्या महिला समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रस्तावीक प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे यांनी मांडले. संचालन रविंद्र येटरे यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेंद्र मेंढे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी राजीव फुंडे, अमित हेमणे, मुकेश मेंढे, जगदिश चुटे, दिपक मेंढे, राजु चुटे, देवराज बहेकार, दिनाजी चुटे, संजय बहेकार, योगेश शिवणकर, बाबूलाल दोनोडे, तुळसीराम मेंढे, बळीराम चुटे, दिलीप मेंढे, गोपालकृष्ण ब्राम्हणकर, गजानन भुते, केवलचंद शेंडे, एस.के.पाथोडे, प्रशांत गायधने, मोहीनी निंबार्ते, तिरथ येटरे, प्रदुमन मारवाडे, अॅड. पाथोडे, इंजि. अनिल पाऊलझगडे, रोशन बोहरे, धनलाल मेंढे व कुणबी समाज सेवा समिती, सांस्कृतिक प्रबंधन समिती व्यापार समिती, महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.