पूर परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 08:29 PM2019-06-30T20:29:01+5:302019-06-30T20:29:24+5:30

नैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नाही. मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.

Make a micro-planning of the flood situation | पूर परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करा

पूर परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करा

Next
ठळक मुद्देकांदबरी बलकवडे : पूर नियंत्रण समन्वय आंतरराज्यीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नाही. मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (दि.२५) आयोजीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मान्सून पूर नियंत्रण समन्वय आंतरराज्यीय बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक विनीता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक, भंडाराचे अपर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी ए.के. घोरमारे, बालाघाट जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता एस.एस.गहरवार, संजय सरोवर प्रकल्प (शिवनी) कार्यकारी अभियंता पी.सी.महाजन, गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी क्रि ष्णा रेड्डी, भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी मान्सून कालावधीत अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे जिल्हा व इतर भागात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जलसंपदा व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून पूर परिस्थिती आटोक्यात आणण्याचे कार्य करावे. धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करु न गावातील नागरिकांना पूर्वसूचना देवून पाणी सोडावे व त्यानंतर नदीच्या पातळीची सूचना संबंधित विभागांनी जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक आहे. अचानक उद्भवणाºया नैसर्र्गिक आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क राहावे अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या. वैनगंगा, बाघ तसेच इतर उपनद्यांमुळे जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये पूर परिस्थितीचा संभाव्य धोका आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमधील पूर परिस्थितीचे संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करु न सुक्ष्म नियोजन करावे. यासाठी धान्यसाठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यास सज्ज ठेवावा असेही त्यांनी सांगीतले.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला संरचना तपासणी, नगर परिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रात नाले- नाली सफाई, अतिक्र मण धारक तथा जीर्ण असलेल्या इमारतींना नोटीस देण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. भारतीय हवामान खात्याद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना-इशारा यासंदर्भात पूर्व माहिती मिळवून योग्य नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात सरासरी १३२७.४९ मि.मी. पाऊस पडतो. गोदिया जिल्ह्याच्या शेजारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा असून या बालाघाट व राजनांदगाव जिल्ह्यात पडणारा पाऊस
संजय सरोवर तथा शिरपूर धरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रवेश करतो. संजय सरोवर (मध्य प्रदेश) येथून सुटणारे विसर्गाचे पाणी २५ तासांत वैनगंगा नदीच्या माध्यमातून बिरसोला संगम घाट (काटी) महाराष्ट्र येथे पोहोचते. तसेच शिरपूर देवरी येथून सुटणारे विसर्गाचे पाणी २७ तासांत बाघनदीच्या माध्यमातून रजेगाव घाटपर्यंत येते. यादरम्यान, धरणातून सोडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली.
पोलीस अधीक्षक साहू यांनी, पोलीस यंत्रणेला पूर परिस्थितीच्या काळात संवादाची माध्यमे ही प्रभावीपणे कार्यरत ठेवावी. तसेच मोबाईल-इंटरनेट सेवा व संवादाचे इतर माध्यम विस्कळीत झाल्यास वायरलेस यंत्रणेने दक्षता बाळगून कार्य करावे असे निर्देश दिले.
बैठकीला बालाघाट (म.प्र.), सिवनी (म.प्र.), भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रमुख, तसेच महसूल व पोलीस खात्यातील विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता आर.एस. सोनटक्के यांनी मांडले. सादरीकरण वाय.एन.राठोड यांनी केले. संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. आभार उपविभागीय अभियंता बी.बी. बिसेन यांनी मानले.
व्हॉट्सअ‍ॅपवरून नागरिकांना सूचना द्या
जिल्ह्यातील पूर परिस्थितीला बघता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करु न पूर परिस्थितीची पूर्वसूचना नागरिकांना दयावी. तसेच पूर परिस्थितीत टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करु न आपत्तीवर मात करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी दिल्या.

Web Title: Make a micro-planning of the flood situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.